आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 26 March 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासात 59,069 नवीन प्रकरणे समोर, हे गेल्या साडे पाच महिन्यात सर्वात जास्त; 7 दिवसांमध्ये जवळपास 1.5 लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण वाढले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 1 कोटी 18 लाख 46 हजार 82 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 59,069 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण समोर आले, 32,912 रुग्ण बरे झाले आणि 257 जणांचा मृत्यू झाला. नवीन प्रकरणे 17 ऑक्टोबरनंतर सर्वात जास्त आहेत. तेव्हा 61,893 रुग्ण आढळले होते. गुरुवारी अ‍ॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 25,857 ची वाढ झाली. सलग दुसऱ्या दिवशी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 25 हजारांपेक्षा जास्त वाढ झाली. गेल्या 7 दिवसांमध्येच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 1 लाख 49 हजार 455 ची वाढ झाली आहे.

देशात आतापर्यंत 1 कोटी 18 लाख 46 हजार 82 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 1 कोटी 12 लाख 62 हजार 503 बरे झाले आहेत. तर 1 लाख 60 हजार 983 रुग्णांनी जीव गमावला आहे. सध्या 4 लाख 17 हजार 46 हजार 82 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.

तर महाराष्ट्रात गुरुवारी 35,952 नवीन रुग्ण समोर आले. 20,444 बरे झाले, तर 111 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल मिळालेल्या रुग्णांचा आकडा महामारीच्या सुरुवातीच्या काळापासून एका दिवसात मिळणाऱ्या रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 24 मार्चला येथे 31,855 आल्या होत्या. राज्यात आतापर्यंत 26.00 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 22.83 लाख बरे झाले आहेत. तर 53,795 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2.62 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...