आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 27 March 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासात 62,632 नवीन रुग्ण आढळले; एकट्या महाराष्ट्रात 37,000, राज्यात यापुर्वीच्या सर्वोच्च स्तरापेक्षा हे आकडे दीडपट जास्त

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 1.19 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत.

देशात कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस भयावह होत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी 62,632 नवीन रुग्ण आढळले. 30,341 बरे झाले आणि 311 जणांचा मृत्यू झाला. हा आकडा १६४ दिवसातील सर्वात मोठा आकडा असून यापुर्वी 15 ऑक्टोबरला 63,441 रुग्ण सापडले होते. यामध्ये सर्वात जास्त वाईट परिस्थिती महाराष्ट्राची असून राज्यात एका दिवसात 36,902 संक्रमित आढळले. हा आकडा 11 सप्टेंबरला आलेल्या पहिल्या सर्वोच्च स्तरापेक्षाही दीडपट जास्त आहे. तेव्हा येथे 24,886 प्रकरणे समोर आली होती.

देशात आतापर्यंत 1.19 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून जवळपास 1.13 कोटी लोक बरे झाले आहेत. 1,61,275 रुग्णांनी जीव गमावला आहे. सध्या 4.49 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी रुग्णांच्या संख्येत वाढ
राज्यात शनिवारी 37,726 नवीन रुग्ण समोर आले. 14,5243 बरे झाले, तर 166 जणांचा मृत्यू झाला. राज्यात काल सापडलेल्या रुग्णांचा आकडा महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका दिवसात मिळणाऱ्या रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 26 मार्चला येथे 35,952 प्रकरणे समोर आली होती. राज्यात आतापर्यंत 26.73 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 23.14 लाख लोख बरे झाले, तर 53,073 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे सध्या 3.03 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...