आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 29 April 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:रुग्ण बरे होण्याचा आकडा 1.5 कोटींच्या पार, एका दिवसात विक्रमी 2.70 लाख झाले बरे; 3.79 लाख नवीन रुग्ण आढळले आणि 3646 मृत्यू

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिंतेचे वृत्त : एका दिवसात 3.79 लाख रुग्ण आढळले, 3646

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. संक्रमणामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा 1.5 कोटींच्या पार गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 78 हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांचा आकडा पाहिला तर विक्रमी 2.70 लाख लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी मंगळवारी 2.62 लोक रिकव्हर झाले होते. ओव्हरऑल रिकव्हरी रेटमध्येही 1.8% ची वाढ झाली आहे. हा आता 82.08% झाला आहे.

चिंतेचे वृत्त : एका दिवसात 3.79 लाख रुग्ण आढळले, 3646
चिंताजनक वृत्त म्हणजे बुधवारी 3 लाख 79 हजार 164 नवीन रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या नवीन रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 27 एप्रिलला सर्वात जास्त 3.62 लाख रुग्ण समोर आले होते. या व्यतिरिक्त 24 तासांच्या आत 3,646 संक्रमितांचा मृत्यूही झाला आहे. हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा तीन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मंगलवारी 3,286 मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या :3.79 लाख
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू :3,646
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले :2.70 लाख
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले :1.83 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले :1.50 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू :2.04 लाख
  • सध्या उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या :30.77 लाख

महाराष्ट्रात बुधवारी 63,309 लोक कोरोना संक्रमित आढळले. 61,181 लोक रिकव्हर झाले आणि 1,035 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 44 लाख 73 हजार लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 37.30 लाख लोक बरे झाले आहेत. तर 67 हजार 214 लोकांचा मृत्यू झाला आहे. 6 लाख 73 हजार 481 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...