आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:24 तासांमध्ये 3.50 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण, सलग 7 व्या दिवशी 3 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू; एकूण संक्रमितांची संख्या 2 कोटींच्या जवळपास

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्यांदाच एका दिवसात 3 लाखांपेक्षा जास्त रिकव्हरी

भारतामध्ये कोरोनाचा विळखा हा दिवसेंदिवस घट्ट होत असताना दिसत आहे. गेल्या 12 दिवसांमध्ये सलग तीन लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण समोर येत आहेत. रविवारी पुन्हा एकदा 3 लाख 50 हजार 598 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 3,071 रुग्णांनी जीव गमावला आहे. आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 2 लाख 79 हजार 882 राहिली. तर एकूण संक्रमितांचा आकडा आता दोन कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. आज ही संख्या 1.99 कोटींच्या पार पोहोचली आहे.

भारतात व्हायरसचा प्रकोप किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज आपल्याचा ताज्या आकडेवारीवरुन येऊ शकतो. शनिवारी जगाच्या टॉप-50 संक्रमित देशांमध्ये मिळून 3.91 लाख लोक संक्रमित आढळले, तर एकट्या भारतामध्ये 3 लाख 92 हजार 459 रुग्ण आढळले. म्हणजेच 50 देशांमधील एकूण रुग्णांपेक्षा एक हजार जास्त रुग्ण भारतात आढळले.

गेल्या 24 तासांमध्ये 2 दिलासादायक वृत्त समोर आले आहेत. पहिले हे की शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी संक्रमितांच्या संख्येमध्ये 9555 ची घट झाली आहे. शुक्रवारी देशामध्ये विक्रमी 4 लाख 2 हजार 14 लोक संक्रमित आढळले. जे शनिवारी कमी होऊन 3 लाख 92 हजार 459 वर पोहोचले. दुसरीकडे गेल्या 24 तासांमध्ये जगात सर्वात जास्त मृत्यू भारतामध्ये झाले आहेत. येथे 3,684 रुग्णांनी जीव गमावला आहे. ब्राझीलमध्ये मृतांची संख्या 2,278 होती. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका होते. येथे शनिवारी 661 लोकांनी जीव गमावला.

पहिल्यांदाच एका दिवसात 3 लाखांपेक्षा जास्त रिकव्हरी
शनिवारचा दिवस रिकव्हरीच्या प्रकरणामध्ये खूप चांगला राहिला. पहिल्यांदाच एका दिवसाच्या आत 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. या दरम्यान रिकव्हर होणाऱ्यांची संख्या 3 लाख 8 हजार 522 होती. आतापर्यंत जगाच्या कोणत्याही देशात एकाच वेळी एवढे रुग्ण रिकव्हर झालेले नाही. यापूर्वी शुक्रवारी 2.99 लाख लोक बरे झाले होते.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस :3.92 लाख
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 3,684
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले :3.08 लाख
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झालेले : 1.95 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले : 1.59 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 2.15 लाख
  • सध्या उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 33.43 लाख
बातम्या आणखी आहेत...