आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 30 April 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासांमध्ये विक्रमी 3.86 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले, 3501 जणांचा झाला मृत्यू; विक्रमी 2.91 लाख लोक बरेही झाले

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 30 लाखांच्या पार पोहोचला

देशात कोरोनामुळे परिस्थिती बिघडत असताना दिसत आहे. गुरुवारी पहिल्यांदा एका दिवसात 3 लाख 86 हजार 854 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत एका दिवसाच्या आत मिळालेल्या नवीन रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. यापूर्वी 28 एप्रिलला सर्वात जास्त 3.79 लाख रुग्णांची ओळख झाली.

या व्यतिरिक्त 24 तासांच्या आत 3,501 संक्रमितांचा मृत्यूही झाला. हा सलग तिसरा दिवस होता जेव्हा तीन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. यापूर्वी बुधवारी 3,646 मृत्यू नोंदवण्यात आले होते.

अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 30 लाखांच्या पार पोहोचला
रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, औषधे, व्हेंटिलेटरच्या संकटामध्ये रोज कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसमध्ये वाढ होत आहे. आता देशात 31 लाख 64 हजार 825 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत सर्वात जास्त 68 लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. खरेतर कोरोनाचा हात वेग राहिला तर येणाऱ्या एका महिन्याच्या आत भारतात सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस असतील.

दिड कोटी लोक झाले बरे
झपाट्याने वाढत असणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये एक दिलासादायक बातमी आहे. संक्रमणामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा भारतात दिड कोटींच्या पार गेला आहे. म्हणजेच आतापर्यंत देशात 1 कोटी 50 लाख 78 हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांचा आकडा पाहिला तर या दरम्यान विक्रमी 2.70 लाख लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी मंगळवारी 2.62 लोक रिकव्हर झाले होते. ओव्हरऑल रिकव्हरी रेटमध्येही 1.8%ची वाढ झाली आहे. हे आतापर्यंत 82.08% झाले आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या :3.86 लाख
 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 3,501
 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 2.91 लाख
 • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 1.87 कोटी
 • आतापर्यंत बरे झाले : 1.53 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू : 2.08 लाख
 • सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 31.64 लाख
बातम्या आणखी आहेत...