आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 31 March 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासांत 355 संक्रमितांचा मृत्यू, हे गेल्या 104 दिवसांमध्ये सर्वात जास्त; एकट्या महाराष्ट्रात 139 जणांनी गमावला जीव

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात मंगळवारी 27,918 नवीन रुग्ण सापडले आहेत.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 53,125 नवीन प्रकरणे समोर आले आहेत. 41,217 रुग्ण बरे झाले आणि 355 जणांचा मृत्यू झाला. मृतांचा हा आकडा गेल्या 104 दिवसांमध्ये सर्वात जास्त आहे. यापूर्वी 16 डिसेंबरला 356 लोकांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी एकट्या महाराष्ट्रातच 139 लोकांचा मृत्यू झाला. राज्यात हा सलग सहावा दिवस होता जेव्हा 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.

देशात आतापर्यंत जवळपास 1.21 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. जवळपास 1.14 कोटी लोक बरे झाले आहेत. 1.62 लाख जणांनी जीव गमावला आहे. 5.49 लाख जणांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

महाराष्ट्रात मंगळवारी 27,918 नवीन रुग्ण सापडले आहेत. 23,820 बरे झाले, तर 139 जणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे. यापूर्वी रविवारी 40,414 आणि सोमवारी 31,643 लोक पॉझिटिव्ह सापडले होते. राज्यात आतापर्यंत 27.73 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 23.77 लाख बरे झाले तर 54,422 जणांचा मृत्यू झाला. येथे सध्या 3.40 लाख लोकांवर उपचार सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...