आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 4 April 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:काल वाढले 92,994  नवे रुग्ण, हे साडे सहा महिन्यात सर्वात जास्त; सलग दुसऱ्या दिवशी 500 पेक्षा जास्त जणांचा झाला मृत्यू

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 1.24 कोटी महामारीच्या विळख्यात सापडले आहेत

देशात कोरोनाची दुसरी लाट ही धोकादायक होत असताना दिसत आहे. येथे शनिवारी 92,994 नवीन संक्रमित आढळले. दरम्यान 60,059 लोक बरे झाले आहेत आणि 514 लोकांचा जीव गेला आहे. एका दिवसात आढळणाऱ्या संक्रमितांविषयी बोलायचे झाले तर काल 197 दिवसांनंतर (6 महिने) एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. यापूर्वी 19 सप्टेंबरला 92,574 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. मृतांच्या बाबतीत सलग दुसऱ्या दिवशी 500 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. यापूर्वी शुक्रवारी 713 लोकांचा मृत्यू झाला होता.

देशात आतापर्यंत 1.24 कोटी महामारीच्या विळख्यात सापडले आहेत
देशात आतापर्यंत जवळपास 1.24 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. जवळपास 1.16 कोटी लोक बरे झाले आहेत. 1.64 लाख जणांनी जीव गमावला आहे. 6.87 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

महाराष्ट्रात शनिवारी 49,447 नवीन रुग्ण आढळले. 37,821 रुग्ण बरे झाले आहेत आणि 277 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 29.53 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 24.95 लाख लोक बरे झाले आहेत. तर 55,656 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे सध्या जवळपास 4.01 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...