आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 6 April 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:आज 8 लाखांच्या पार होऊ शकतो अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा, सलग दिसऱ्या दिवशी 90,000 पेक्षा जास्त प्रकरणे आली समोर

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत जवळपास 1.27 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापले आहेत.

देशात कोरोनाचा वाढता आलेख चिंतेचे कारण ठरत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 96,563 नवीन रुग्ण आढळले. 50,095 बरे झाले आणि 445 जणांनी जीव गमावला. यासोबतच अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या 7.84 लाख झाली आहे. यामध्ये गेल्या सहा दिवसांपासून 30,000 पेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली आहे. अशावेळी शक्यता आहे की, आज हा आकडा 8 लाखांच्या पार होऊ शकतो.

देशात आतापर्यंत जवळपास 1.27 कोटी लोक या महामारीच्या विळख्यात सापले आहेत. यामधून 1.17 कोटी बरे झाले आहेत आणि 1.65 लाख जणांनी जीव गमावला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

तर महाराष्ट्रात सोमवारी 47,288 नवीन रुग्ण समोर आले. 26,252 रुग्ण बरे झाले आणि 155 जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 30.57 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 25 लाखांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. तर 56,033 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे सध्या जवळपास 4.51 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...