आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 7 दिवसांमध्ये पॉझिटिव्हिटी रेटमध्ये 6.5% ची घट, आता प्रत्येकी 100 टेस्ट मागे आढळत आहेत 3 संक्रमित

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काल 20.36 लाख टेस्ट, 1.14 संक्रमित आढळले

देशात कोरोनाची दुसरी लाट सलग कमकुवत होत असताना दिसत आहे. याचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो की, एका आठवड्यापूर्वी संक्रमितांचा दर 9.1% होता. तो शनिवारी कमी होऊन 3.2% पर्यंत आला आहे. म्हणजेच गेल्या आठवड्यापर्यंत देशात प्रत्येकी 100 टेस्टमधून 10 लोकांमध्ये कोरोनाची पुष्टी होत होती. हा आकडा कमी होऊन आता 3 आणि 4 च्यामध्ये पोहोचला आहे.

दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 0.50%
दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे केवळ 381 नवीन प्रकरणे समोर आले. या दरम्यान 1,189 लोकांना डिस्चार्ज मिळाला आणि 34 लोकांचा मृत्यू झाला. येथे पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊन 0.50% झाला आहे. दुसऱ्या लाटेच्या पीक दरम्यान हा दर 32% पर्यंत झाला होता. आता दिल्लीमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण केवळ 5,889 राहिले आहेत.

दुसरीकडे दिल्ली जवळील हरियाणामध्ये राज्य सरकारने कोरोनासंबंधीत प्रतिबंध 14 जूनपर्यंत वाढवले आहेत. दुकान, मॉल, रेस्टॉरंट, बार, धार्मिक स्थळे काही अटींसह पुन्हा उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

काल 20.36 लाख टेस्ट, 1.14 संक्रमित आढळले
काल देशात 20 लाख 36 हजार 311 सँपलची तपासणी करण्यात आली. यामध्ये कोरोनाचे 1 लाख 14 हजार 415 रुग्ण समोर आले. हे गेल्या 61 दिवसांमध्ये एका दिवसात मिळालेल्या संक्रमितांचा सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 5 एप्रिलला 96,573 केस आल्या होत्या. गेल्या 24 तासांमध्ये 2,681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि 1 लाख 89 हजार 89 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन रुग्ण : 1.14 लाख
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले :1.89 लाख
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू :2,681
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 2.88 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले : 2.69 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू :3.46 लाख
  • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या :14.73 लाख
बातम्या आणखी आहेत...