आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 9 April 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासांमध्ये विक्रमी 1.31 लाख रुग्ण आढळले; एकाच वेळी एवढे रुग्ण वाढणारा अमेरिकेनंतर भारत दुसरा देश

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेच्या मार्गावर भारत, पहिले रुग्ण कमी झाले नंतर अचानक वाढले

देशात कोरोना व्हायरसची परिस्थिती दररोज बिघडत आहे. संक्रमितांची प्रकरणे रोज नविन विक्रम बनवत आहेत. गेल्या 24 तासांच्या आत देशात 1 लाख 31 हजार 878 लोक संक्रमित आढळले आहेत. गेल्या वर्षी व्हायरस आल्यानंतरपासून आतापर्यंतचा हा एका दिवसातील रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी बुधवारी देशात सर्वात जास्त 1 लाख 26 हजार 276 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

गुरुवारी रिकव्हर होणाऱ्यांचा आकडा 61 हजार 829 राहिला. संक्रमणामुळे होणाऱ्या मृतांची संख्या 802 राहिली. 17 अक्टोबरनंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एका दिवसाच्या आत 800 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. 17 अक्टोबरला 1032 रुग्णांनी जीव गमावला होता.

आता प्रत्येक 100 लोकांमध्ये 9 संक्रमित आढळत आहेत.
देशात रुग्ण आढळण्याची संख्या वाढून 9.21% झाली आहे. म्हणजेच आता प्रत्येक 100 लोकांमध्ये 9 कोरोना संक्रमित आढळत आहेत. तीन आठवड्यांपूर्वी म्हणजेच 11 ते 17 या काळात रुग्ण आढळण्याचा वेग 3.11%, 18 ते 24 मार्चच्या काळात 4.46% आणि 25 ते 31 मार्चच्या काळात 6.04% या वेगाने देशात कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे.

अमेरिकेच्या मार्गावर भारत, पहिले रुग्ण कमी झाले नंतर अचानक वाढले
कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत आता अमेरिकेच्या मार्गावर आहे. अमेरिकेतही गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोना प्रकरणे झपाट्याने कमी होत होते, नंतर अचानक अक्टोबरमध्ये यामध्ये वाढ झाली आणि डिसेंबरमध्ये एका महिन्याच्या आत विक्रमी 63.45 लाख रुग्ण आढळले.

अमेरिकेत कोरोनाचा पहिला पीक 24 जुलै रोजी आला होता, जेव्हा एका दिवसात सर्वाधिक 80 हजार प्रकरणे समोर आली, परंतु दुसर्‍या पीकमध्ये हा रेकॉर्ड मोडला. 7 नोव्हेंबरपासून येथे दररोज सुमारे एक लाखाहून अधिक रुग्णांची ओळख पटली आहे. 8 जानेवारी रोजी येथे 3 लाख 9 हजार पेक्षा जास्त संक्रमित आढळले. असेच काहीसे भारतात घडत आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत फारच कमी प्रकरणे आढळून आली परंतु मार्चपासून त्यात प्रचंड वाढ होऊ लागली. आता दररोज एक लाखाहून अधिक रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतातील कोरोनाच्या पहिल्या पीकमध्ये, एका दिवसात सर्वाधिक 97 हजार लोक संक्रमित झाले होते. आकडेवारीनुसार जर या वेळी संसर्गाची गती थांबली नाही तर परिस्थिती अमेरिकेपेक्षा वाईट होईल.

बातम्या आणखी आहेत...