आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update , Above 45 Age, Everyone Will Get Vaccine From 1 April

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठा निर्णय:कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणाची व्याप्ती वाढवली, 45 वर्षांवरील सर्वांना लस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 4.85 कोटी डोस दिले

देशात कोरोनाची दुसरी लाट आणि वाढत्या संसर्गाकडे पाहता केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवली आहे. आता १ एप्रिलपासून ४५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाचे सर्वच नागरिक कोरोना लस घेऊ शकतील. केंद्रीय कॅबिनेटने मंगळवारी हा निर्णय घेतला. यानंतर पत्रपरिषदेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, यासाठी कोविन पोर्टलवर एक एप्रिलपासून नावनाेंदणीही सुरू होणार आहे.

देशात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली होती. आतापर्यंत ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजार असलेल्या लोकांना ४.८५ कोटींपेक्षा जास्त काेरोनाचे डोस देण्यात आलेले आहेत. देशात ४५ ते ६० वर्षे वयोगटातील सुमारे ३५ कोटी लोक आहेत. त्यापैकी आजारी १ कोटी लोकांचे लसीकरण सुरूच आहे. दरम्यान, मंगळवारी देशात कोरोनाचे ४७,०१४ नवीन रुग्ण समोर आले आहेत. ते मंगळवारी सापडलेल्या ४०,७१५ रुग्णांच्या तुलनेत ६,२९९ ने जास्त आहेत. सर्वाधिक रुग्ण पुन्हा महाराष्ट्रातच आढळले आहेत.

लस वाया जाण्यापासून रोखता येईल
१ एप्रिलपासून कोण लस घेऊ शकेल?

सध्या ४५ वर्षांवरील आजारी लोकांनाच लस दिली जात आहे. १ एप्रिलपासून हे निर्बंध हटतील. ४५ वर्षे आणि त्यावरील वयाचे आजारी आणि तंदुरुस्त असे सर्व लोक लस घेऊ शकतील.

आताही को-मॉर्बिडिटी सर्टिफिकेट अपलोड करणे आवश्यक असेल का?
४५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस दिली जाईल. त्यामुळे आता को-मॉर्बिडिटी सर्टिफिकेट (सहव्याधी प्रमाणपत्र) आवश्यक नसेल. १ एप्रिलपर्यंत पोर्टलमध्ये आवश्यक बदल होतील. ऑनलाइन रजिस्ट्रेशन, सेंटरवर रजिस्ट्रेशन किंवा लसीकरणाच्या वेळी डॉक्टरला सर्टिफिकेट दाखवण्याची गरज राहणार नाही.

मी लसीचा एक डोस घेतला आहे. दुसरा डोस केव्हा घेऊ शकेन?
कोविशील्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर सरकारने वाढवले आहे. पहिल्या डोसनंतर ४ ते ८ आठवड्यांत केव्हाही दुसरा डोस घेऊ शकता. दुसरा डोस केव्हा घ्यावा हे लसीकरण केंद्राचे डॉक्टरही तुम्हाला सांगू शकतात.

४५ वर्षे व त्यावरील वयाच्या लोकांना लस दिल्याने काय फायदा होईल?
देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. लसीकरणाची व्याप्ती वाढल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यात मदत मिळेल. लसीकरण केंद्रावर लस वाया जाण्यापासून रोखता येईल.

रजिस्ट्रेशन आताही आवश्यक आहे का?
होय, आवश्यक आहे. रजिस्ट्रेशनशिवाय तुम्ही लस घेऊ शकणार नाही.

लस घेण्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांत किती पैसे लागत आहेत?
सरकारी रुग्णालयांत लस नि:शुल्क आहे. खासगी रुग्णालयात एका डोसचे शुल्क २५० रुपये आहे. दोन डोससाठी ५०० रुपये द्यावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...