आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update, Death Toll India Today, 12th May

कोरोना देशात:मंगळवारी आढळले 3.48 लाख संक्रमित, तर 4198 मृत्यू; सलग दुसऱ्या दिवशी नवीन संक्रमितांपेक्षा रिकव्हरीचा आकडा जास्त

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • आतापर्यंत 17.51 कोटी लोकांचे लसीकरण

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा कमी आढळला आहे. मंगळवारी देशभरात 3 लाख 48 हजार 417 नवीन संक्रमित सापडेल असून, 4198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासात 3 लाख 55 हजार 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

यापूर्वी, सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, तर 3.55 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा वेग वाढत आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते.

देशातील कोरोना महामारीची आकडेवारी

 • मागील 24 तासात एकूण रुग्ण आढळले: 3.48 लाख
 • मृत्यू: 4,198
 • ठीक झाले: 3.55 लाख
 • आतापर्यंचे एकूण संक्रमित: 2.33 कोटी
 • आतापर्यंत ठीक झाले: 1.93 कोटी
 • एकूण मृत्यू: 2.54 लाख
 • सध्या उपचार सुरू: 36.99 लाख

आतापर्यंत 17.51 कोटी लोकांचे लसीकरण

आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, मंगळवारी 23.8 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. तर, आतापर्यंत देशातील 17.51 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. यात 95 लाख 81 हजार 872 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 65 लाख 38 हजार 656 जणांना दुसरा डोस झाला आहे.

याशिवाय, फ्रंट लाइन वर्कर्सपैकी 1 कोटी 41 लाख 45 हजार 83 जणांना पहिलाडोस आणि 79 लाख 50 हजार 430 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. 45 वर्षांपेक्षा वरील 5 कोटी 58 लाख 70 हजार 91 जणांचा पहिला डोस तर 78 लाख 17 हजार 926 जणांचा दुसरा डोस झाला आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 5 कोटी 39 लाख 54 हजार 858 लोकांचा पहिला, तर 1 कोटी 62 लाख 73 हजार 279 लोकांचा दुसरा डोसदेखील झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...