आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Maharashtra Pune Madhya Pradesh Bhopal Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today, Mumbai Delhi Coronavirus News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लसीकरण:कोवीशील्ड व्हॅक्सीनबाबत सरकारची नवीन गाइडलाइन, आता 4 ऐवजी 8 आठवड्यानंतर मिळणार दुसरा डोस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चोविस तासांमध्ये 25,578 रुग्णांची विक्रमी वाढ

सरकारने अॅस्ट्राजेनेकाची कोरोना व्हॅक्सीन कोवीशील्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील वेळेला वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या निर्देशानुसार, कोवीशील्डच्या दोन डोसमध्ये आता कमीत-कमी 6 ते 8 आठवड्यांचे अंतर ठेवले जाईल. सध्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर आहे. दरम्यान, हा निर्णय कोव्हॅक्सिनवर लागू होणार नसल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने सांगितल्यानुसार, नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्यूनाइजेशन (NTAGI) आणि व्हॅक्सीनेशन एक्सपर्ट ग्रुपच्या ताजा रिसर्चनंतर हा निर्णय घेतला जात आहे. या निर्णयाचे अंमलबजावनी राज्य सरकारने करण्याचेही केंद्राने सांगितेल आहे. दावा केला जात आहे की, व्हॅक्सीनचा दुसरा डोस 6-8 आठवड्यानंतर दिल्यानंतर व्हॅक्सीनचा परिणाम जास्त मिळत आहे.

चोविस तासांमध्ये 25,578 रुग्णांची विक्रमी वाढ

देशात कोरोना संक्रमनामुळे नवीन रुग्णात मोठ्या प्रमाणावर भर पडत असून दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे. चितेंची गोष्ट ही की, नवीन रुग्णांसोबत उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडादेखील कमी होत नाही आहे. गेल्या 38 दिवसांमध्ये नवीन रुग्णांच्या संख्येत तब्बल 2 लाखांनी वाढ झाली आहे. देशात 11 फेब्रुवारी रोजी 1.33 लाख पॉझिटिव्ह रुग्ण होते. गेल्या रविवारी त्यात भर पडत त्यांची संख्या 3.31 लाख एवढी झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये हे एका दिवसातील सर्वात मोठा आकडा असून त्यात 25,578 वाढ झाली आहे. यापूर्वी 10 सप्टेंबर रोजी 24,610 नवीन रुग्ण आढळून आले होते.

रविवारी आढळले होते 47,009 नवीन रुग्ण

देशात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याचा आकडा सातत्याने वाढत आहे. गेल्या चोविस तासात देशात 47,009 नवीन रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत देशात 21,206 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून यात 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात रुग्णांची संख्या सतत वाढत वाढत असल्याने आज यामध्ये 28,653 नवीन रुग्णांची भर पडली आहे. एकट्या महाराष्ट्र राज्यात आज 30,535 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी राज्यात सर्वाधिक 24,886 नवीन रुग्ण आढळहून आले होते. त्यानंतर सर्वात जास्त रुग्ण आज सापडले आहे. यामुळे राज्यातील शासन आण‍ि प्रशासन दोन्ही चिंतेत आहे.

देशात आता एकूण 1 कोटी 16 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. 1 कोटी 11 लाख रुग्ण बरे झाले आहे. तर 1 लाख 60 हजार लोकांचा मृत्यूही झाला आहे. देशात आजघडीला 3 लाख 31 हजार 671 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हे सर्व आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...