आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update 30 March 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:सलग सहाव्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 50 हजारांवर; देशात आज साडेपाच लाखांवर सक्रीय रुग्ण जाण्याची शक्यता

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 1.21 कोटी

देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यातच देशात गेल्या चोवीस तासात 56,119 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहे. हा आकडा सलग सहाव्या दिवसांपासून सतत वाढतच आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासात आढळलेल्या रुग्णांमध्ये 36,983 लोक बरे झाले असून यात 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच उपचार घेणाऱ्या लोकांमध्ये 18,883 आकड्यांनी वाढ झाली आहे. देशात सलग सहाव्या दिवसापासून सक्रीय रुग्णांचा आकडा 50 हजारांपेक्षा जास्त आहे. यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांचा आकडा 60 हजारांवर गेलेला आहे.

देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 1.21 कोटी
देशात आतापर्यंत 1.21 कोटी लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात सापडले आहे. यामध्ये 1.14 कोटी लोक बरे झाले आहेत. तर 1.62 लाख लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. आज रोजी देशात 5.37 लाख लोकांवर उपचार सुरु आहेत. कोरोना महामारीचे सर्व आकडे covid19india.org या संकेतस्थळावरुन घेण्यात आले आहे.

महाराष्ट्रामध्ये दररोजपेक्षा 10 हजार रुग्ण कमी
राज्यात गेल्या चोवीस तासात 31,643 नवीन रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये 20,854 लोक बरे झाले असून 112 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण आढळलेल्या प्रकरणात गेल्या चोवीस तासात 10 हजाराने घसरण झाली. यापूर्वी रविवारला 40,414 लोक पॉझिटिव्ह सापडले होते. राज्यात आतापर्यंत 27.45 लाख लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात सापडले असून 23.53 लोक बरे झाले आहे. तर यात 54,283 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्याच्या घडीला 3.36 लाख लोकांवर उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...