आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Maharashtra Pune Novel Corona (COVID 19) Death Toll India Today, Mumbai Delhi Coronavirus News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:सलग चौथ्या दिवशी देशात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण;  2761 मृत्यू; 2.15 लाख लोक कोरोनामुक्त

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सक्रीय रुग्णांचा आकडा म्हणजेच उपचार घेणार्‍यांची संख्या 26 लाख 74 हजार 287 पोहचली आहे

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे देशात नवीन रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाख 48 हजार 979 रुग्ण आढळून आले आहे. हा आकडा कोरोना महामारी सुरु झाल्यापासूनचा सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, देशात सक्रीय रुग्णांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, यामध्ये दिलासा देणारी बातमी म्हणजे सक्रीय रुग्णांसोबत कोरोनापासून मुक्त होणार्‍यांचे प्रमाणदेखील वाढतच आहे. विशेष म्हणजे सक्रीय रुग्णांमधील 2 लाख 15 हजार 803 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात गेल्या 100 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम सुरु असून येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनामुळे 2 हजार 761 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील सर्वात जास्त मृत्यूंची नोंद महाराष्ट्र राज्यात झाली असून येथे एका दिवसांत 676 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या राजधानी दिल्लीत 357 लोकांनी आपले प्राण गमावले आहे. देशात सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखांवर गेलेला आहे.

सक्रीय रुग्णांचा आकडा 26 लाखांवर
देशात सध्या सक्रीय रुग्णांचा आकडा म्हणजेच उपचार घेणार्‍यांची संख्या 26 लाख 74 हजार 287 पोहचली आहे. सक्रीय रुग्णांच्या आकड्यात दररोज वाढ होत असून शुक्रवारी यामध्ये 1 लाख 30 हजार 199 वाढ झाली आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन प्रकरणे :3.48 लाख
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू :2,761
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले :2.15 लाख
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले :1.69 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले :1.40 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू :1.92 लाख
  • सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या :26.74 लाख
बातम्या आणखी आहेत...