आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Novel Corona (COVID 19) Death Toll India Today, Mumbai Delhi Coronavirus News And Live Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:गेल्या 24 तासांत देशात आढळले 3.32 लाख नवे रुग्ण; सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • दिलासा देणारी बातमी म्हणजे एका दिवसात 1.92 लोक कोरोनामुक्त झाले

देशात कोरोना महामारीचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाख 32 हजार 320 नवीन रुग्ण आढळून आले आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांवर पोहचला आहे. दरम्यान, यामध्ये एका 2 हजार 256 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी बुधवारी देशात 2 हजार 101 लोकांचा मृत्यू झाला असून त्यादिवशीचा कोरोना संक्रमितांचा आकडा 3 लाख 15 हजारांवर होता. भारत देश कोरोना महामारीचे नवीन सक्रीय रुग्ण आढळण्यात जगात पहिल्यानंबर आला असून त्यानंतर अमेरिका आणि ब्राझीलचा नंबर येत आहे.

दिलासा - एका दिवसात 1.98 लाख लोक कोरोनामुक्त झाले
देशात वाढता कोरोना महामारीचा संसर्ग पाहता देशातून एक दिलासा देणारी बातमी आली आहे. दरम्यान, देशात गेल्या चोवीस तासांत 1.98 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे हा आकडा महामारी सुरु झाल्यापासूनचा सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी गुरुवारला रेकार्ड ब्रेक 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले होते. त्यामुळे देशात वाढत्या कोरोना रुग्णांसोबतच बरे होणाऱ्या लोकांचा आकडादेखील वाढतच आहे.

सक्रीय रुग्णांचा आकडा 25 लाखांवर
देशात रोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे सक्रीय रुग्णांचा आकड्यांतदेखील वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत सक्रीय रुग्णांचा आकडा 25 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. यामध्ये गुरुवारी 1 लाख 37 हजार 671 सक्रीय रुग्णांची नोंद करण्यात आली होती. सध्या देशात 24 लाख 22 हजार 80 लोकांवर उपचार सुरु आहेत.

देशातील कोरोना महामारी आकड्यांमध्ये

 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण रुग्ण : 3.32 लाख
 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 2,256
 • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 1.98 लाख
 • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 1.62 कोटी
 • आतापर्यंत बरे झाले : 1.36 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू :1.86 लाख
 • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या 24.22 लाख
बातम्या आणखी आहेत...