आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात आढळले सर्वाधिक 4.12 लाख नवे रुग्ण, तर 3,979 संक्रमितांचा मृत्यू

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलासादायक बाब म्हणजे, 3.24 लाख रुग्ण ठक झाले

कोरोनाची दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवला आहे. यातच बुधवारी देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. मागील 24 तासात देशभरात 4 लाख 12 हजार 373 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 3,979 रुग्णांचा मृत्यूही झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3.24 लाख रुग्ण ठीकही झाले.

ही दुसरी वेळ आहे, जेव्हा देशात 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. यापूर्वी, 30 एप्रिलला 4 लाख 2 हजार 14 रुग्णांची नोंद झाली होती आणि 3525 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज ठीक झालेल्या रुग्णांचा आकडाही कालपेक्षा कमी आहे. मंगळवारी देशात 3.37 लाख रुग्ण ठीक झाले होते, तर आज 3.24 लाख रुग्ण ठीक झाले आहेत.

महाराष्ट्रानंतर कर्नाटक आणि केरळमध्ये रुग्ण वाढ
दररोज मिळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आता महाराष्ट्रानंतर कर्नाटक आणि केरळचा नंबर लागत आहे. कर्नाटकात बुधवारी 50 हजारांपेक्ष जास्त, तर केरळमध्ये 41,953 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

बातम्या आणखी आहेत...