आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update,Corona (COVID 19) Death Toll India Today 11may, Mumbai Delhi Coronavirus New

देशात कोरोना:2 महिन्यानंतर अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट, सोमवारी आढळले 3.29 लाख संक्रमित, तर 3.55 लाख रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील 62 दिवसांत पहिल्यांदा ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा जास्त

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते.

दुसरी दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी मागील पंधरा दिवसातील सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, 26 एप्रिलला 3.19 लाख रुग्ण आढळले होते. दरम्यान, सोमवारी 3,877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • मागील 24 तासात रुग्ण आढळले: 3.29 लाख
  • मागील 24 तासात झालेले मृत्यू: 3,877
  • मागील 24 तासात रुग्ण ठीक झाले: 3.55 लाख
  • आतापर्यंचे एकूण संक्रमित: 2.29 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 1.90 कोटी
  • एकूण मृत्यू: 2.50 लाख
बातम्या आणखी आहेत...