आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination Maharastra State Top In India LIVE Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:मुंबईमध्ये आज 5,504 नवीन संक्रमित आढळले, हे एका दिवसात आतापर्यंत सर्वात जास्त प्रकरणे; दिल्लीमध्ये 1,515 प्रकरणे, या वर्षी सर्वात जास्त

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीमध्ये कोरोनाचे 1,515 केस समोर आले आहेत.

मुंबईमध्ये आज कोरोनाचे 5,504 नवीन रुग्ण आढळले. हा आकडा एका दिवसात आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. तसेच देशात कोरोना संक्रमणाचे 81% नवीन प्रकरणे महाराष्ट्र आणि गुजरातसह सहा राज्यात येत आहेत.

दिल्लीमध्ये कोरोनाचे 1,515 केस समोर आले आहेत. हे वर्ष 2021 मध्ये एक दिवसाच्या आत दिल्लीमध्ये समोर आलेल्या प्रकरणांमध्ये सर्वात जास्त आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात संक्रमण वेगाने पाय पसरत आहे. यामधून महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन राज्य आहेत, जेथे महामारी सुरू झाल्यानंतर एका दिवसात सर्वात जास्त पॉझिटिव्ह केस वाढल्या आहेत.

दरम्यान, कर्नाटक सरकारने बंगळुरू येणाऱ्या लोकांसाठी कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट आवश्यक केला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री सुधारकर म्हणाले की, इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांना RT-PCR टेस्टची निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे अनिवार्य असेल.

बुधवार रोजी 53,419 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण

देशात कोरोना संक्रमनामुळे नवीन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. देशात बुधवार रोजी 53,419 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. यात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये 26,575 रुग्ण बरे झाले असून 249 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा गेल्या पाच महिन्यातील सर्वात मोठा आकडा आहे. कारण त्यावेळी 53,931 देशात नवीन रुग्ण आढळून आले होते. देशात सर्वात जास्त रुग्णांचा आकडा महाराष्ट्र राज्यामध्ये आढळून आला आहे. गेल्या चोविस तासांत राज्यामध्ये 31,855 नवीन रुग्ण आढळले असून यात 15,098 रुग्ण बरे झाले आहे. तर 95 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या चोविस तासांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 26,588 अंकानी वाढ झाली आहे. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा हा 4 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. देशात आतापर्यंत 1 करोड़ 17 लाख 87 हजार 13 कोरोनाचा महामारीच्या विळ्याख्यात आले असून 1 करोड़ 12 लाख 29 हजार 591 रुग्ण ठीक झाले आहे. तर लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा covid19india.org या संकेतस्थळावरुन घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...