आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 तासांत आढळले 2.11 लाख नवे रुग्ण, 3,841 मृत्यू; 26 राज्यांत नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण जास्त

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 11 हजार 275 नवीन रुग्ण आढळले आहे. यामध्ये 3 हजार 841 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बातमी म्हणजे गेल्या 24 तासांत समोर येणाऱ्या प्रकरणापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. बुधवार रोजी देशातील 2 लाख 82 हजार 924 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. कारण यापूर्वी 24 मे ला 1.95 लाख तर 25 मे ला 2.08 लाख नवे रुग्ण कोरोनाबाधीत आढळले होते.

यासोबतच देशातील सक्रिय रुग्णांचा आकडादेखील कमी होत आहे. देशात सध्या 24 लाख 15 हजारांवर लोकांवर उपचार सुरु आहे. बुधवारी सक्रिय रुग्णसंख्येत 75 हजार 601 ने कमी झाले होते.

या राज्यात रिकव्हरी रेट जास्त
एकीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे देशातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील 26 राज्यांत नवीन येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

देशातील कोरोना महामारीची आकडेवारी
बुधवारी नवीन संक्रमित आढळले: 2.11 लाख
बुधवारी ठीक झालेली रुग्णसंख्या: 2.82 लाख
बुधवारी झालेले मृत्यू: 3,841
आतापर्यंतचे एकूण संक्रमित: 2.73 कोटी
आतापर्यंत ठीक झाले: 2.46 कोटी
एकूण मृत्यू: 3.11 लाख
सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 24.15 लाख

बातम्या आणखी आहेत...