आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown Ground Report From Bihar : Maximum Migrants Are Willing To Return Other State For Job

कोरोना काळ:आगाऊ रक्कम, दीडपट पगार, परतण्यासाठी एसी बस...पायी गेलेल्या कामगारांची कारखानदार करताहेत सोय

पाटणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वाधिक मजूर जेथे परतले, त्या बिहारच्या 10 जिल्ह्यांतील 61 गावांतून वृत्तांत...

लॉकडाऊननंतर हजारो किमी पायी चालत आलेले मजूर सर्व वेदना विसरून परतू लागले आहेत. कारण, ज्यांनी काम बंद झाल्याने त्यांना वेतन, आसरा देण्यास नकार दिला होता तेच आता त्यांना २० हजार रुपये आगाऊ, दीडपट पगार तसेच परतण्यासाठी एसी बस पाठवत आहेत. दैनिक भास्करच्या ९ टीम त्या १० जिल्ह्यांत ६१ गावांत गेल्या, जेथे सर्वाधिक स्थलांतरित मजूर परतले आहेत. यातील ७ जिल्ह्यांतील गावांमधून सरासरी ५०% पेक्षा जास्त जण परतले आहेत. अनेकांना गावात काम मिळाले, तर काही अजूनही कामाच्या शोधात आहेत. मुझफ्फरपूरचे तीन आणि अररियाच्या दोन तालुक्यांत, तर पंजाब-हरियाणातून आलेल्या एसी बस मजुरांना घेऊन गेल्या. किती जण परतले याची नोंद नाही, मात्र गावकरी नावे सांगतात. ते म्हणतात, बोलावणाऱ्याने २०-२० हजार रुपये आगाऊ दिले. कोणाला दुप्पट मजुरीचे आश्वासन मिळाले, तर कोणाला तीन महिन्यांची भरपाई. ज्यांना योग्य वाटले ते मागील वेदना विसरले. अनेक जण जिल्ह्यात जॉब कार्ड मिळवून मनरेगात मजुरी करणारे आढळले. सांगतात, १९४ रुपयांचे काम, तेही रोज नाही. यामुळेच बोलावणे आल्यावर जात आहोत. किशनगंजच्या बहादूरगंजमध्ये भेटलेल्या मजुरांनी सांगितले, हातात कौशल्य आहे, मात्र काम नाही. बाहेर होतो तर कमावून पाठवायचो. आता दुसऱ्यांवर ओझे. लुधियानातून परतलेले संजीव सांगतात, तेथे रोज ६०० रुपये कमवायचो. येथे शक्य दिसत नाही.

गावात कमाई बाहेरसारखी नाही

पूर्णियातील मखनाहात ५०- ६० मजुरांनी सांगितले, शासकीय योजनेमुळे लाभ झाल्यास थांबू. नसीम, हसीब, छोटू सांगतात, शासकीय योजनांचा लाभ झालेला नाही. शाहबाज सांगतात, आमच्याकडे कौशल्य आहे, सरकारने आमच्याकडून काम घ्यावे. मिरचाईबाडीत अमित दिल्लीहून परतला आहे. तेथे २२ हजार वेतन होते, भत्ता वेगळा. गाडी चालवतो. काम मिळाल्यास ३००-३५० येतात, नाही तर काहीच नाही.

मजूर म्हणाले, आभार...देशाने आमची ताकद ओळखली

कोरोना वाढल्याने परतणाऱ्या मजुरांनी कुटुंब नेलेले नाही. मजूर व कुटुंबीयांचे म्हणणे आहे, जे आम्हाला काम देऊन उपकाराची भाषा करायचे त्यांना आमची ताकद समजली. आता एकटे गेलो आहोत, स्थिती सुधारल्यास व काम राहिल्यास आम्हीही जाऊ. कोल्हुवार पंचायतीच्या मांडर गावात भेटलेले लोक असतील किंवा बस्ती बुढीबांधमध्ये महाराष्ट्रातून परतलेले, सर्वांना कोरोन संकट जायची प्रतीक्षा आहे.

गावात मनरेगा कौशल्यामुळे मजुरांना दुप्पट पगाराची ऑफर

कोरोना काळात परतलेल्या बिहारींना बिहार सरकारच्या योजनांमधून तर काम मिळत आहे. मात्र, पुन्हा लॉकडाऊन व दरवर्षी येणाऱ्या पुरामुळेही ते घाबरले आहेत. बहुतांशी लोकांनी एका सुरात सांगितले की, सरकारचे प्रयत्न दिसताहेत. मात्र, दुसऱ्याकडच्या कमाईसारखे येथे अवघड आहे. आता तर कारखाना मालक व शेती करवून घेणारे पहिल्यापेक्षा जास्त पैसे देत आहेत. परतण्याचा खर्च आणि मागील बाकीही. खरे म्हणजे बिहारी मजुरांशिवाय पंजाब-हरियाणातील सधन शेतकऱ्यांची शेती खराब होत आहे. तेथे मजुरांची टंचाई आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणातील कारखाना मालक त्यांचे जुने अनुभव मजूर बिहारींना निरोपावर निरोप पाठवत आहेत. कामगार अनेक वर्षांपासून त्यांच्या कारखान्यात व शेतीत काम करत आहेत. कामाचे बारकावे माहीत आहेत.