आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown Is Being Extended For One More Week In Delhi CM Arvind Kejriwal Announced

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत कोरोना नियंत्रणाबाहेर:मुख्यमंत्री केजरीवाल यांनी लॉकडाऊन एक आठवडा अजून वाढवला, म्हटले - संक्रमणाच्या विरोधात हे शेवटचे हत्यार

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्सिजनची कमतरता कायम आहे

दिल्लीमध्ये लॉकडाऊन एक आठवड्यासाठी वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी म्हटले की, पुढच्या सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू राहिल. त्यांनी म्हटले की, संक्रमणाच्या विरोधात लॉकडाऊन हे अखेरचे हत्यार आहे. यापूर्वी दिल्लीमध्ये 19 एप्रिलला रात्री 10 वाजेपासून लॉकडाऊन सुरू झाले होते. जे 26 एप्रिल सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार होते.

ऑक्सिजनच्या अभावाचा मुद्दा केजरीवाल यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला. ते म्हणाले की, आम्हाला केंद्राकडून 490 मीट्रिक टन ऑक्सिजन वाटप करण्यात आले आहे, हे वाटप आमच्यापर्यंतही पोहोचत नाही. आमची रोजची गरज 700 मीट्रिक टन आहे.

संसर्ग अद्याप कमी होत नाही
केजरीवाल म्हणाले की, आम्ही आठवड्याभराचा लॉकडाऊन लागू केला होता, जो उद्या सकाळी 6 वाजता संपेल. हे कोरोना विरूद्ध शेवटचे शस्त्र होते, परंतु अद्याप संसर्ग कमी होत नाही. आम्ही सर्वांशी बोललो आणि सर्वांनी सांगितले की लॉकडाउन लादले पाहिजे. लॉकडाऊन दरम्यान संक्रमणाचे प्रमाण 36-37% पर्यंत पोहोचले. ते 1-2 दिवसात कमी झाले आहे आणि 30 वर आले आहे. आम्ही देवाला प्रार्थना करतो की कोरोनापासून आपल्याला मुक्ती मिळावी.

ऑक्सिजनची कमतरता कायम आहे
गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनची समस्या खूप आहे. त्यात उणीव आहे. आमची गरज 700 टन एवढी आहे आणि केंद्राने 490 टन वाटप केले आहे, परंतु हे ऑक्सिजनही आमच्याकडे येत नाही. शनिवारी ते 330 टन पर्यंत पोहोचले. ठिकठिकाणाहून ऑक्सिजन येणार आहे, परंतू हे पोहोचू शकत नाहीये आणि यामुळेच दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे.

काल 22 हजारांपेक्षा जास्त संक्रमित
देशाची राजधानी दिल्लीमध्ये शनिवारी 22,695 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 23,572 लोक बरे झाले आणि 357 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 10 लाख 04 हजार 782 लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 8 लाख 97 हजार 804 लोकही बरे झाले आहेत. तर 13,898 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 93,080 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...