आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown Migrants: Centre Asks States To Operate More Special Trains For Migrant Workers; Issues SOP For Travel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्राकडून एसओपी जारी:प्रवासी मजुरांसाठी जास्तीत-जास्त स्पेशल ट्रेन चालवा; राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्राकडून निर्देश जारी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकही मजूर रस्त्यावरून पायी जाता कामा नये, राज्यांनी खबरदारी घ्यावी -केंद्र

प्रवासी मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी जास्तीत जास्त विशेष रेल्वे चालवाव्या अशा सूचना केंद्र सरकारकडून मंगळवारी जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने राज्यांनी महिला, लहान मुले आणि वृद्धांना प्राधान्य द्यावे असेही सांगण्यात आले आहे. लॉकडाउनमध्ये देशाच्या विविध कानाकोपऱ्यात अडकलेल्यांसाठी केंद्री गृह मंत्रालयाकडून राज्यांना एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल देण्यात आला आहे. यामध्ये एखाद्या योजनेचा किंवा आदेशाच्या अंमलबजावणीचा सविस्तर तपशील दिला जातो.

कोरोना व्हायरसची आणि रोजगार जाण्याच्या भीतीमुळे अनेक जण आपल्या घरांच्या दिशेने निघाले आहेत. अशात अनेक कामगार दुसऱ्या राज्य आणि शहरांमध्ये भटकत आहेत. यांना आप-आपल्या घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काही दिशानिर्देश जारी केले जात आहेत अशी माहिती केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी दिली.

भल्ला यांनी सांगितल्याप्रमाणे, या मजुरांसाठी सर्व स्पेशल रेल्वे उपलब्ध करून देत असताना राज्य आणि रेल्वे विभागात समन्वय असावा. सोबतच, रेल्वे प्रवास करत असताना त्यांच्या वेटिंग रुम, सॅनिटायजेशन, खाद्य आणि आरोग्याची काळजी घ्यायला हवी असेही त्यांनी सांगितले. एखादी रेल्वे, बस किंवा इतर प्रवासाचे वाहन नेमके किती वाजता निघणार आहे याची स्पष्ट माहिती जारी करावी. जेणेकरून प्रवाशांमध्ये संभ्रम किंवा अफवा निर्माण होणार नाही. राज्य सरकारांनी प्रवाशांपैकी महिला, चिमुकले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी. पायी जाणाऱ्या प्रवासी मजुरांच्या राहण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकांवर त्या-त्या जिल्हा प्रशासनाकडून केली जाऊ शकते. जिल्हा प्रशासनाने एनजीओंच्या मदतीने प्रवाशांच्या मदतीसाठी सर्व माहिती पुरवण्याचे नियोजन करावे. यासोबतच, बसची संख्या वाढवता आली तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत.

गृह मंत्रालयाचे सचिव राजीव भल्ला यांच्या मते, प्रवासी मजुरांना घेउन जाणाऱ्या बससाठी आंतरराज्य सीमा उघडण्याची मुभा देण्यात यावी. त्यांच्या राहण्याची आणि मुबलक खाण्या-पिण्याची व्यवस्था करावी. सोबतच, त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत असताना त्यांचे काउंसेलिंग सुद्धा करण्यात यावे. जिल्ह्यांना निर्देश देण्याची जबाबदारी त्या-त्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची राहील. प्रत्येक मजुरासाठी ट्रेन आणि बसची व्यवस्था करावी जेणेकरून एकाही मजुराला आपल्या घरी जाण्यासाठी रस्त्यांवर पायी जावे लागू नये असेही भल्ला म्हणाले आहेत. यासंदर्भात गृह मंत्रालयातील अधिकारी स्थानिक पातळीपर्यंत नोडल आणि रेल्वे अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहेत. त्यांना कुठलीही मदत हवी असल्यास ती करण्यास आम्ही तयार आहोत. 

सुधारित एसओपीनुसार, श्रमिक स्पेशल ट्रेनला रेल्वे मंत्रालय गृह मंत्रालयाशी सल्ला मसलत केल्यानंतर परवानगी देऊ शकतील. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना रेल्वेशी संपर्क साधून भटकणाऱ्या प्रवासी मजुरांची व्यवस्था करावी लागेल. या ट्रेन कुठून आणि कधी निघणार आहेत. तसेच त्यांचे स्टॉप काय असतील याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला कुठल्याही जिल्हा बंदी आणि राज्य सीमा बंदीचा त्रास होता कामा नये. याची खबरदारी प्रत्येक राज्य आणि जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागेल. यात सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करावी लागेल. त्यातही केवळ कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देता येईल. कोरोनाची लक्षणे असल्यास त्यांना प्रवास करता येणार नाही. प्रवाशांना प्रवास करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. प्रवासाला निघण्यापूर्वी आणि पोहोचल्यानंतर सर्व आरोग्य संदर्भातील दिशा-निर्देशांचे पालन करावे लागेल. दरम्यान, 1 मे पासून रेल्वे विभागाकडून 1500 श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यात आल्या. यामध्ये आतापर्यंत 17 लाख प्रवासी मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...