आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown Reduces Income Of 84% Of Households In The Country, 2 Crore Youth Between The Ages Of 20 And 30 Lose Their Jobs

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संकट:लॉकडाऊनमध्ये देशातील ८४% कुटुंबांच्या उत्पन्नात घट, २० ते ३० वर्षीय २.७ कोटी युवकांनी रोजगार गमावला

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • एक तृतीयांश कुटुंबांकडे केवळ एक आठवड्याचे संसाधन शिल्लक

देशात जवळपास एक तृतीयांश कुटुंबांकडे आता केवळ एक आठवड्यांपर्यंतचाच अन्नधान्याचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा शिल्लक आहे. यानंतर त्यांना मदत न मिळाल्यास ते अडचणीत येऊ शकतात. हा दावा सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयआय)च्या हाऊसहोल्ड सर्वेक्षणात केला आहे.

या सर्वेक्षणात भारतीय कुटुंबांच्या उत्पन्नावर लॉकडाऊनचा काय परिणाम झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. सर्वेक्षणानुसार ८४ टक्के कुटुंबांचे मासिक उत्पन्न कमी झाले आहे, तर अतिरिक्त मदतीशिवाय ते एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकू शकणार नाही असे देशभरातील ३४ टक्के कुटुंबांनी म्हटले आहे. सर्वेक्षणानुसार, २१ मार्चला बेरोजगारीचे प्रमाण ७.४ % होते, जे ५ मे रोजी २५.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. दिल्ली, पंजाब आणि कर्नाटकमध्ये सर्वात कमी परिणाम झाला, तर बिहार, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये जास्त दुष्परिणाम झाले.

२० ते ३० वर्षीय २.७ कोटी युवकांनी रोजगार गमावला

अहवालानुसार २० ते ३० वर्षे वयोगटातील २ कोटी ७० लाख तरुणांनी एप्रिलमध्ये नोकरी गमावली आहे. नोकरी गमावलेल्यांपैकी ११% लोक २०-२४ वयोगटातील होते. २०१९-२० मध्ये एकूण रोजगार मिळालेल्या‌‌ंपैकी हे ८.५ % आहे. २५-२९ वर्षे वयोगटातील १.४० कोटी जणांनी नोकरी गमावली आहे. या वयोगटातील लोकांचा २०१९-२० मधील एकूण रोजगारामध्ये ११.१% वाटा होता. मात्र ११.५ % लोकांनी नोकरी गमावली.

बातम्या आणखी आहेत...