आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना व्हायरसबाबत सरकारच्या नवीन गाइडलाइन्समध्ये सामान्य नागरिकांसाठी अनेक निर्देश देण्यात आले आहेत. यात पब्लिक प्लेसवर मास्क घालणे अनिवार्य आणि थुंकल्यावर दंडदेखील आकारला जाईल. तसेच, क्वारेंटाइमध्ये राहण्यावर , वर्कप्लेसवर, रस्त्यावर फिरण्यापासून तर अंत्यविधीत सामील होणे आणि लिफ्टमध्ये जाण्यासाठी नियम लावण्यात आले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य
सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य असेल. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर शिक्षा आणि दंडदेखील आकारला जाईल. तुमच्या कृत्यामुळे एखाद्याचा जीव गेला, तर दोन वर्षांची शिक्षादेखील होईल. सर्व ठिकाणी सरकारच्या निर्देशानुसार सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल.
लग्नात गर्दी जमवल्यास शिक्षा
लग्न किंवा अंत्यविधीसारख्या ठिकाणी सरकारच्या निर्देशांचे पालन करावे लागेल. अंत्यविधीत 20 पेक्षा जास्त लोक येऊ शकणार नाहीत. दारू, तंबाखू, आणु गुटखा विक्रीवर बंदी आणि यांना खाऊन थुंकल्यावर शिक्षा आणि दंड. लग्नात गर्दी जमवल्यास आणि धार्मिक कार्यक्रम केल्यास एका वर्षांची शिक्षा आणि दंड. यादरम्यान एखाद्याचा जीव गेला, तर दोन वर्षांची शिक्षा. तसेच, लिफ्टमध्ये दोनपेक्षा जास्त लोक जाऊ शकणार नाहीत.
चार चाकी वाहनामध्ये फक्त दोन व्यक्ती बसू शकतील
इमरजेंसी सर्विस, मेडिकल आणि वेटेनरी केअरशी संबंधी प्रवास करण्यासाठी खासगी गाड्यांचा वापर केला जाऊ शकतो. पण, चार चाकी गाडीमध्ये फक्त दोन व्यक्ती तर टु-
व्हीलरवर फक्त एकाला जाण्यास परवानगी आहे.
क्वारेंटाइनमध्ये राहण्याचे नियम मोडल्यास कारवाई
ज्या लोकांना मेडिकल अथॉरिटीजने घरात राहण्याचे आदेश दिले आहेत,त्यांनी याचे पालन न केल्यास त्यांच्यावर कलम 188 नुसार कारवाई केली जाईल.
कामाच्या ठिकाणी दिलेले निर्देश
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.