आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lockdown :Telangana Woman 50 Rides 1400 Km On Scooty To Bring Back Son Stranded In Andhra

आईची जिद्द:आंध्रप्रदेशमध्ये अडकलेल्या मुलाला घरी आणण्यासाठी तेलंगणाच्या 48 वर्षीय महिलेने स्कुटीवर केला 1400 किमी प्रवास

हैदराबाद3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मित्राला सोडण्यासाठी नेल्लोर गेला होता मुलगा, मात्र लॉकडाउन लागल्यानंतर तिथेच अडकला

लॉकडाऊनमुळे देशात हजारो लोक विविध भागात अडकले आहेत. घरी पोहोचण्याची वाट पहात आहे. असे एक प्रकरण तेलंगणात पाहायला मिळाले. येथे एका आईने मुलाला घरी आणण्यासाठी स्कूटीवर 1400 किलोमीटरचा प्रवास केला. सोमवारी ती निजामाबादहून आंध्र प्रदेशातील नेल्लोरला गेली आणि बुधवारी संध्याकाळी मुलासह घरी परतली. निजामाबाद ते नेल्लोर हे अंतर सुमारे 700 किमी आहे. रझिया बेगम या 48 वर्षीय महिलेने सांगितले की, तिचे कुटुंब लहान आहे. दोन मुले आहेत. पतीचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले. मोठा मुलगा इंजिनिअर आहे आणि लहान मुलगा निजामुद्दीन सध्या शिक्षण घेत आहे. त्याला डॉक्टर व्हायची इच्छा आहे. तो नेल्लोरमध्ये होता. त्यांनी सांगितले की, ''दुचाकीवरून प्रवास करणे एखाद्या महिलेसाठी सोपे नव्हते, पण मुलाला परत आणण्याच्या इच्छाशक्तीपुढे भीतीही नाहिशी झाली. मी डबा भरला आणि निघाले. रात्री कुठेही ट्रॅफिक नव्हे, रस्तेही रिकामे आणि सामसुम होते. यामुळे मला नक्कीच भीती वाटली, परंतु मी धैर्य गमावले नाही.' रझिया हैदराबादपासून 200 किलोमीटर दूर निजामाबाद येथील एका सरकारी शाळेत मुख्यध्यापिका आहेत. 

निजामुद्दीन मित्राला सोडण्यासाठी गेला, तिथेच अडकला

रझिया बेगम यांनी सांगितले की, निजामुद्दीन 12 मार्च रोजी आपल्या मित्राला सोडण्यासाठी नेल्लोर येथे गेला होता. यादरम्यान कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाउन करण्यात आले आणि तो परत येऊ शकला नाही. मी मोठ्या मुलाला पाठवू शकत नव्हते कारण त्याच्याबाबत अनेक शंका उपस्थित होत्या. यामुळे मी स्वतः जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की, मी माझी परिस्थिती स्थानिक प्रशासन आणि बोधान एसीपींना सांगितली होती. त्यांनी मला प्रवास करण्याची परवानगी दिली आणि पास जारी केला.  

बातम्या आणखी आहेत...