आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown : Transport Toll Collection Will Resume On April 20 From National Highways, Ministry Of Road Transport And Highways Ordered

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रान्सपोर्ट:राष्ट्रीय महामार्गवर 20 एप्रिलपासून पुन्हा सुरू होईल टोलवसुली, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिले आदेश

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाव्हायरसमुळे एनएचएआयने 25 मार्चपासून सर्व महामार्गांवरील टोलवसुली बंद केली होती
  • 20 एप्रिलपासून सर्व प्रकारची मालवाहतूक करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे

सरकारने देशातील ट्रक वाहतुकीस मान्यता दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 20 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोलवसुली पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी कोरोनाव्हायरसमुळे एनएचएआयने 25 मार्चपासून सर्व महामार्गांवरील टोलवसुली बंद केली होती. आता एनएचएआयने पुन्हा टोल वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एनएचएआयला लिहिलेल्या एका पत्रात म्हटले की, गृहमंत्रालयाने 20 एप्रिलपासून ट्रक आणि सामनाची वाहतून करणाऱ्या वाहनांना परवानगी दिली आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानंतर एनएचएआयने 20 एप्रिलपासून टोल वसुली सुरू करावी.

टोल वसुलीला अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचा विरोध

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) 20 एप्रिलपासून टोल वसुलीला विरोध दर्शविला आहे. एकीकडे, सरकारला सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्याची इच्छा आहे, जे आम्ही प्रत्येक कठीणप्रसंगी करण्यास तयार आहोत. मात्र दुसरीकडे, सध्याच्या परिस्थितीत मोडकळीस आलेल्या वाहतूक व्यवसायाला कोणतीही सवलत देण्यास तयार नाही. सरकारने ट्रान्सपोर्टला काही लाभ द्यावेत जेणेकरून त्यांना थोडी मदत मिळू शकेल.

20 एप्रिलपासून शासनाने वाहतुकीस परवानगी दिली

20 एप्रिलपासून सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. रेल्वेद्वराे सामान आणि पार्सल पाठवण्यात येतील. कार्गो विमाने देखील मदत करण्यासाठी आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येतील. बंदरांतून देशामध्ये आणि बाहेर एलपीजी, अन्न व वैद्यकीय पुरवठा केला जाईल. रस्त्याद्वारे आवश्यक वस्तू घेऊन जाणारे ट्रक आणि वाहनांना परवानगी दिली आहे. यामध्ये दोन चालक आणि एक मदतनीसला परवानगी मिळेल.

बातम्या आणखी आहेत...