आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdown Travel Guidelines Updates | India Coronavirus Lockdown 4.0 Travel Rules Latest News Details: Train Domestic Flights Interstate Movement

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन 4.0:देशांतर्गत-आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि मेट्रो ट्रेन 31 मे पर्यंत बंद, राज्यांतर्गत वाहतुकीचा निर्णय राज्य सरकार घेणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारने लॉकडाउन फेज-4 साठी नवीन गाइडलाइन्स जारी केले आहेत

देशातील कोरोना महामारीची सामना करण्यासाठी देशातील लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. यासाठी केंद्र सरकारने रविवारी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. या नव्या गाइडलाइन्सनुसार, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्री विमान सेवा बंदच राहणार आहे. याशिवाय मेट्रो ट्रेन सेवादेखील सुरू होणार नाही. याशिवाय कंटेन्टमेंट झोनसोडून राज्यांतर्गत वाहतुकीचा निर्णय राज्य सरकारवर सोपवण्यात आला आहे.

सरकारने लॉकडाउन-3 (4 मे-17 मे) दरम्यान परराज्यात अडकलेल्या प्रवासी मजुरांसाठी स्पेशल ट्रेन आणि बस सुरू केल्या होत्या. दिल्लीतून स्पेशल ट्रेन्सची सुरुवात झाली. याशिवाय वंदे भारत आणि समुद्र सेतू मिशनअंतर्गत इतर देशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यात आले. 

काही स्पेशल आणि मजुरांसाठी ट्रेन सुरू राहणार

लॉकडाउनदरम्यान परराज्यात अडकलेल्या मजुरांसाठी 1000 श्रमिक स्पेशल ट्रेन्स चालवल्या. या ट्रेन्सच्या माध्यमातून 10 लाखांपेक्षा जास्त मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यात आले आहे. याशिवाय यात्रेकरुंसाठीदेखील काही स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या होत्या. परंतू, आता नवीन गाइडलाइन्स नुसार मेट्रो ट्रेन बंदच राहणार आहे.

विमान सेवा तुर्तास बंद असेल

सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवा 23 मार्च आणि देशांतर्गत विमान सेवा 25 मार्चला बंद केली होती. उड्डयन मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी तिकीटांची बुकींन न घेण्यास सांगितले होते. लॉकडाउन फेज-4 मध्येही या विमान सेवांवरील निर्बंध कायम राहणार आहेत.

विमानसेवा बंद ठेवणे का गरजेचे ?

देशातील 20 प्रमुख विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेतली जातात. या विमानतळावरुन 55 देशांच्या 80 शहरापर्यंत जाता येते. जगातील अनेक देश कोरोनाच्या विळख्यात आहेत. अशात आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील निर्बंध गरजेचे आहेत. स्टेटिस्टानुसार, भारतात 2019 मध्ये अंदाजे 7 कोटी लोकांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवेने प्रवास केला होता. तर, देशात दर महिन्याला सरासरी 1.3 कोटी लोक प्रवास करतात. यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...