आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन:कर्नाटक, गुजरात व दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, तामिळनाडूत १९ ते ३० पर्यंत वाढ

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीत आता दररोज 18 हजार चाचण्या केल्या जाणार

देशात सोमवारी ११५०२ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या आता ३,३२,४२४ झाली आहे. संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा येत्या दोन दिवसांत सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. मंगळवारी दुपारी ३ वाजता २१ राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रशासकांशी मोदी चर्चा करतील, तर बुधवारी होणाऱ्या बैठकीत उर्वरित १५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री सहभागी होतील.

दरम्यान, वाढत्या संसर्गामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा रंगताहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानिसामी यांनी चेन्नई आणि शेजारच्या तीन जिल्ह्यांत १९ ते ३० जूनपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात रविवारी तेथे पूर्णपणे शटडाऊन राहील, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अंदाज चुकीचे ठरवत लॉकडाऊन लावण्याची योजना नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक बाधित मुंबईत सोमवारपासून लोकल सुरू झाल्या. तूर्तास अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच लोकलमधून प्रवासाची परवानगी आहे.

दिल्लीत रोज १८ हजार काेरोनाच्या चाचण्या होणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना रुग्णांच्या उपचाराचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयाला भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी दिल्लीतील सर्व पक्षांसोबत बैठक घेतली. त्यानंतर भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले की, २० जूनपासून दिल्लीत कोरोनाच्या रोज १८ हजार टेस्ट होतील. दिल्ली सरकारनेही सर्व लॅब व रुग्णालयांना ४८ तासांच्या आत कोरोना चाचण्या वाढवण्याचे निर्देश दिले.

बातम्या आणखी आहेत...