आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdwon 2 : Government Will Bring Second Stimulus Package To Deal With Corona Crisis, Finance Minister Nirmala Sitharaman To Meet PM Modi Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन 2.0:कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सरकार आणणार दुसरे प्रोत्साहन पॅकेज, अर्थमंत्री सीतारमण आज घेणार पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • या पॅकेजमध्ये एमएसएमई क्षेत्रावर विशेष लक्ष, कोरोनामुळे हेच क्षेत्र सर्वाधिक प्रभावित

कोरोनव्हायरसमुळे चालू असलेल्या लॉकडाऊनचा आर्थिक परिणाम कमी करण्यासाठी सरकार दुसरे प्रोत्साहन पॅकेज आणण्याचे काम करत आहे. या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत प्रोत्साहन पॅकेजवर चर्चा केली जाईल. एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्यानुसार ईटीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जर पीएम आणि अर्थमंत्र्यांमध्ये पॅकेजबाबत अंतिम निर्णल झाल्यास त्याची घोषणा लवकरच केली जाईल. 

एमएसएमई क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते

आणखी एका अधिकाऱ्याचे हवाल्याने रिपोर्टमध्ये म्हटले की, लॉकडाउन 2.0 सुरु झाल्यानंतर घोषित होणाऱ्या दुसऱ्या प्रोत्साहन पॅकेजमध्ये मायक्रो, स्मॉल आणि मीडियम इंटरप्रायजेस (एमएसएमई)वर विशेष लक्ष केंद्रीत केले जाऊ शकते. कारण लॉकडाउनमुळे हेच क्षेत्र सर्वाधिक प्रभावित झाले आहे. अधिकाऱ्यानुसार या क्षेत्राला 15 हजार कोटी रुपयांचे क्रेडिट गॅरंटी फंड दिला जाऊ शकतो. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी कोणत्या करण्यात येणाऱ्या उपाययोजनात सर्वात अगोदर एमएसएमईची घोषणा असू शकते अशी अपेक्षा आहे. याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मार्चमध्ये 1.7 लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली होती. यामध्ये गरीबांसाठी थेट कॅश ट्रान्सफर व्यतिरिक्त मोफत रेशन समाविष्ट होते. 

लॉकडाउनमुळे 10 लाख कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज 

देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला 6 ते 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा विविध वित्तीय संस्थांनी अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या आर्थिक वृद्धीचा अंदाज 5.8 टक्क्यांवरून 1.9 टक्क्यांपर्यंत केला आहे. या लॉकडाउनमुळे रिटेल, ट्रॅव्हल आणि टुरिझम, हॉस्पिटालिटी, कन्स्ट्रक्शन आणि ट्रान्सपोर्टसह अनेक क्षेत्रांवर वाईट परिणाम झाला आहे. आता 21 दिवसांचा लॉकडाउन 40 दिवसांचा झाल्याने अनेक क्षेत्रातील अडचणी वाढल्या आहे. 

बातम्या आणखी आहेत...