आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lockdwon 3 : The Third Phase Will Start In The Country With Big Discounts. From Today, The Economy Will Be On Track In 82% Of The Districts

लॉकडाऊन 3.0:मोठी सूट देत तिसरा टप्पा देशात सुरू, आजपासून ८२% जिल्ह्यांत अर्थव्यवस्था रुळावर येणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सावधगिरी : मास्क, सहा फूट अंतराचा नियम पाळावा लागेल
  • आता देशात आणखी २५ लाख दुकाने उघडतील, ५० लाख लोक कामावर परततील

(धर्मेंद्रसिंह भदौरिया)

लॉकडाऊन ३.० मध्ये देशभर अनेक भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात सूट मिळाल्याने आज मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडतील. उद्योग-धंदे सुरू होतील. आता बहुतांश बंधने कंटेनमेंट झोनपुरतीच असतील. देशात ८२% जिल्ह्यांत जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येऊ लागेल.

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू होत आहे. कडक अटींसह सरकारने या काळात बरीच सूटही दिली आहे. ४० दिवसांनंतर लोक आता कामांवर परतू शकतील. मात्र, अनेक राज्यांनी आपल्या अधिक संसर्ग असलेल्या शहरांत पूर्ण लॉकडाऊन कायम ठेवले आहे. देशात एकूण ७३३ जिल्ह्यांपैकी ८२% जिल्हे ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये आहेत. येथे सोमवारपासून व्यवहार वाढतील. ३०० हून अधिक जिल्ह्यांत बस आणि कॅब सशर्त चालू शकतील. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे एमडी महेश व्यास यांनी सांगितले, की २० एप्रिलनंतर सूट दिल्यामुळे १ कोटी लोक कामावर परतले आहेत. जेएनयूचे माजी प्रोफेसर आणि अर्थतज्ञ अरुण कुमार म्हणाले की, लॉकडाऊन-२ पर्यंत अर्थव्यवस्था २५% सुरू होती. आता ती ३५ टक्क्यांवर जाईल. उद्योगांचा विचार करता या क्षेत्रात आता ७-८ टक्के काम सुरू होऊ शकेल. दरम्यान, उद्योगांतील परराज्यांतील कामगारांचे घरी परतणे सुरू असल्याने उद्योगांत पुरेशा क्षमतेने काम सुरू होण्यात सध्या अडचणी येऊ शकतात.

रिअल इस्टेट : देशात २०% निर्माणाधीन प्रकल्पात आता काम सुरू होऊ शकेल

> क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जक्षय शहा म्हणाले की, अटींसह सूट मिळाली आहे. मान्सून सुरू होत आहे. यामुळे जुने प्रकल्प सुरू होऊ शकतील. आजपासून २० टक्के प्रकल्पात काम सुरू होऊ शकेल.

> रिअल इस्टेट, बांधकाम क्षेत्रात ५ कोटी नोकऱ्या आहेत. हे क्षेत्र आधीपासून प्रभावित.

दुकाने : आता देशात आणखी २५ लाख दुकाने उघडतील, ५० लाख लोक कामावर परततील

> कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे बी. सी. भारतीय यांच्यानुसार, आधीच आवश्यक दुकाने सुरू आहेत. नव्या सूटमुळे आणखी २५ लाख दुकाने सुरू होण्याची आशा आहे. देशात सुमारे ७ कोटी दुकाने आहेत.

> या दुकानांच्या माध्यमातून ५० लाख लोक कामावर परततील. रोजगार मिळेल.

एमएसएमई: पुरवठा करणाऱ्या ३५% कंपन्या सुरू होतील

> लघुउद्योग भारतीचे सरचिटणीस गोविंद लेले यांच्यानुसार, नव्या सवलतीमुळे मोठ्या कंपन्यांना पुरवठा करणाऱ्या ३० ते ३५% कंपन्या व स्वत:चे उत्पादन करणारे १० ते १५ टक्के उद्याेग सुरू होतील.

> एकंदरीत सुमारे ३०% एमएसएमई युनिट्स उत्पादन सुरू करू शकतात.

उद्योग: देशात १५% उद्योगांत उत्पादन सुरू होण्याचा अंदाज

> लॉकडाऊन-३ मध्ये नव्या सूटमुळे सुमारे १० ते १५% उद्योग उत्पादन सुरू करू शकतील. बहुतांशी ठिकाणांवर मजूर नसल्याने आणि कच्चा मालाच्या अभावात मोठे उद्योग हळूहळू उघडणे सुरू होईल.

> देशात सध्या २३ लाखांपेक्षा जास्त कारखाने आहेत, ज्यात २.६ कोटी लोक काम करतात.

  • 30 पेक्षा अिधक मोठी व्यावसायिक शहरे सध्या रेड झोनमध्ये.
  • 33 रेड झोन यूपी (१९) आणि महाराष्ट्र (१४) राज्यात आहेत.
  • 603 जिल्ह्यांत लोक कामासाठी बाहेर निघू शकतील.
  • 130 जिल्हे रेड झोन. बऱ्याच ठिकाणी सक्ती सुरू राहील.
बातम्या आणखी आहेत...