आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lockdwon Effect | Tirupati Balaji Temple Salaries Delayed Due To Coronavirus Covid 19 Lockdown

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन इफेक्ट:सर्वात श्रीमंत मंदिर तिरुपती बालाजी मंदिरावर आर्थिक संकट, 21 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारास होऊ शकतो उशीर

भोपाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्मचार्‍यांचे भत्ते आणि पगारांवर दरमहा 120 कोटींहून अधिक खर्च होतो
  • सन 2020-21 साठी तिरुपती ट्रस्टचे बजेट 3300 कोटींपेक्षा जास्त आहे

देशातील सर्वात श्रीमंत समजले जाणारे तिरुपती बालाजी मंदिरही लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटातून जात आहे. मंदिराला 21 हजार कर्मचाऱ्यांना या महिन्यात वेळेवर पगार देण्यास अडचण येत आहे. याबाबत कर्मचार्‍यांनाही माहिती देण्यात आली आहे की पगार कापला किंवा थांबवला जाणार नाही, परंतु उशीर होऊ शकतो. 

20 मार्चपासून सामान्य भाविकांसाठी बंद असलेल्या तिरुपती मंदिरात दर महिन्याला रोख आणि हुंडीद्वारे सुमारे 200 कोटी रुपयांचे दान मिळते. मागील 55 दिवसांत मंदिराला जवळपास 400 कोटी रुपयांच्या देणगीचे नुकसान झाले आहे. 

देणगी कमी झाल्यामुळे ट्रस्टला त्याच्या दैनंदिन कामात आणि खर्चासाठी अडचणींचा सामना करावाल गात आहे. ट्रस्टने या आर्थिक वर्षासाठी (2020-21) फेब्रुवारीमध्येच 3309 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले होते.

ट्रस्टचे पीआरओ टी. रवि यांच्यानुसार ट्रस्टमध्ये २१ हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. यापैकी आठ हजार कर्मचारी कायम नियुक्तीवर आहेत, उर्वरित 13 हजार कर्मचारी करार तत्वावर आहेत. लॉकडाऊनमुळे उर्वरित संस्था ज्या प्रकारे आर्थिक संकटातून जात आहेत, त्याचप्रमाणे तिरुपती ट्रस्टलाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रस्टला आपल्या कर्मचार्‍यांचे वेळेवर पगार आणि भत्ते देताना काही अडचणी येत आहेत.

दररोज सुमारे 80 हजार भाविक दर्शनासाठी येतात

मंदिरात सामान्य दिवशी सुमारे 80 हजार ते एक लाखपर्यंत भाविक येत असतात. मात्र, लॉकडाउनमुले मंदिर 20 मार्चपासून दर्शनासाठी बंद आहे. केवळ पुजारी आणि मंदिरातील अधिका्यांना प्रवेशाची परवानगी आहे. एका महिन्यात सुमारे 150 ते 170 कोटींची दान हुंडीत प्राप्त होते, याशिवाय महिन्यात 200 ते 220 कोटींचे उत्पन्न लड्डू प्रसाद, विश्रामगृह, यात्रि निवास इत्यादींच्या विक्रीतून मिळते. यापैकी 120 कोटी रुपये फक्त भत्ते आणि पगारांवर खर्च केले जातात.  सन 2020-21 मध्ये कर्मचार्‍यांच्या पगारावर सुमारे 13 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मंदिराची मुदत ठेव आणि राखीव सोने वापरणार नाही

मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष वाय.एस. सबबरेड्डी यांनी स्पष्ट केले की, पगार आणि भत्ते देण्यासाठी मंदिर ट्रस्ट कधीही आपली निश्चित ठेव आणि राखीव सोन्याला हात लावणार नाही.  तिरुमाला देवस्थानम् ट्रस्टकडे सुमारे 1400 कोटींची रोख आणि 8 टन सोने राखीव आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीही असे न करण्यास सांगितले कारण ही रक्कम आणि सोने भाविकांनी दिले आहे. याच्याशी त्यांच्या भावना यात जोडल्या गेलेल्या आहेत. याचा वापर ट्रस्टच्या खर्चांसाठी केला जाणार नाही. 

बातम्या आणखी आहेत...