आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Loksabha Election 2024 Latest News Update; Narendra Modi Vs Congress, Prashant Kishore, PK, Sonia Gandhi, Rahul Gandhi, Priyanka Gandhi

काँग्रेसमध्ये 'अच्छे दिन' आणणार PK?:राहुल-प्रियंकांना भेटल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात प्रशांत किशोर; यूपी-पंजाब नाही तर राष्ट्रीय स्तरावर निभावणार भूमिका

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • पीकेसोबतच्या बैठकीत फक्त राहुल-प्रियंकाच नव्हे तर सोनियासुद्धा उपस्थित होत्या

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर मंगळवारी दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले. तेव्हा देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. या बैठकीला प्रियंका गांधी आणि पंजाब कॉंग्रेसचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते. या बैठकीसंदर्भात असे म्हटले होते की हे प्रकरण पंजाबमधील नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांच्यात सुरू असलेल्या भांडणाशी संबंधित आहे. पण आता समोर येतेय की, प्रशांत किशोर म्हणजे PK कॉंग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात. काँग्रेसची प्लानिंग आहे की, पीके यांनी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेससाठी महत्त्वाची भूमिका बजवावी.

पीकेसोबतच्या बैठकीत फक्त राहुल-प्रियंकाच नव्हे तर सोनियासुद्धा उपस्थित होत्या
न्यूज पोर्टल एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने एका रिपोर्टमध्ये प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये सामील होत असल्याचे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत केवळ राहुल आणि प्रियंकाच नव्हे तर सोनिया गांधीही उपस्थित होत्या. ही बैठक पंजाबमधील लढाई किंवा पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकांबद्दल नव्हती, तर 2024 च्या लोकसभा निवडणुकांविषयी होती.

या बैठकीत कॉंग्रेसने काही मोठ्या योजना केल्या आखल्याचेही सूत्रांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांची मोठी भूमिका पक्षाला हवी आहे जेणेकरून पीके कॉंग्रेसला या निर्णायक लढाईसाठी तयार करु शकतील.

पीके म्हणाले - मी जे करत आहे, आता ते करायची इच्छा नाही
या बैठकीसंदर्भात प्रशांत किशोर म्हणाले की, आता जे करतोय, पुढे ते करायचे नाही. त्यांना हे ठिकाण सोडायचे आहे. ते म्हणाले की त्यांना आपल्या आयुष्यात ब्रेक घ्यायचा आहे आणि काहीतरी वेगळे करायचे आहे.

पुन्हा यूपीच्या मुलाजवळ पीके, काय आहे गेम प्लान?

 • 2017 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार होते. त्यांनीच नारा दिला होता की, "UP के लड़के' और "UP को ये साथ पसंद है।' मात्र ही युती निवडणूक जिंकू शकली नाही. प्रशांत यांना वाटत होते की, या निवडणुकीमध्ये चेहरा प्रियंका असावी, पण असे झाले नसल्याचे समोर आले.
 • 2021 मध्ये प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या विजयासाठी योजना आखली. दावा करण्यात आला होता की, भाजप जर 100 आकड्यांच्या पार गेली तर निवडणूक रणनीति आखण्याचे काम सोडून देील. भाजपने 100 च्या आतच डाव गुंडाळला आणि प्रशांत किशोर यांचा दावा कायम राहिला.
 • आता प्रशांत किशोर हे अमरिंदर यांचे मुख्य सल्लागार आहेत आणि तेही अवघ्या एक रुपयांच्या पगारावर. पुढच्या वर्षी पंजाब निवडणुकाही आहेत. अशा परिस्थितीत त्यांची उपस्थिती कॉंग्रेससाठी मोठ्या दिलासाची बाब आहे, परंतु निवडणूकीच्या अगोदरच सिद्धू आणि अमरिंदर यांच्या संघर्षामुळे समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत याचे त्वरित निराकरण होणे आवश्यक आहे आणि यासाठी प्रशांत किशोरपेक्षा चांगले कुणीही नाही.
 • यूपीच्या निवडणुकीसंदर्भात प्रियंका गांधीही सक्रिय झाल्या आहेत. सोमवारीच त्यांनी उत्तर प्रदेशातील कॉंग्रेस नेत्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. दरम्यान राहुल-प्रियंकांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत की, यूपी निवडणुकीत प्रशांत किशोर यांची मोठी भूमिका असू शकते आणि हे लक्षात घेऊन कॉंग्रेस आपला खेळ आराखडा तयार करत आहे अशी शक्यता आहे.

PK यांनी म्हटले होते, विरोधकांच्या मोर्चात कोणतीच भूमिका नाही

 1. 11 आणि 21 जून रोजी प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतली. तेव्हा जूनमध्ये देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. नंतर पवारांसोबत मिळून ममता बॅनर्जी काही तरी डाव रचणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावेळी तिसऱ्या आघाडीविषयी बरीच चर्चा झाली होती.
 2. मात्र स्वतः प्रशांत किशोर आणि शरद पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. दोघांनी म्हटले होते की, काँग्रेस पक्षाशिवाय तिसऱ्या आघाडीचे कोणतेही अस्तित्व नाही. यानंतर 22 ला राष्ट्रमंचची बैठक झाली. याचे नेतृत्त्व तृणमूलचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी केले होते.
 3. राष्ट्रमंचच्या बैठकीमध्ये शरद पवार, नॅशनल कॉन्फ्रेंसचे फारुक अब्दुल्ला, आम आमदमी पक्षाचे संजय सिंह, सीपीआयचे डी राजा, राइटर जावेद अख्तर यांचा समावेश होता. बहुजन समाज पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस या बैठकीमध्ये सामिल झाले नव्हते.
 4. बैठकीनंतर तिसऱ्या आघाडीच्या प्रश्नावर प्रशांत किशोर स्पष्ट म्हणाले होते की, अशी कोणतीही तिसरी आघाडी मोदींना टक्कर देऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी म्हटले होते की, 2024 च्या निवडणुकीत विरोधीपक्षाच्या मोर्चामध्ये त्यांची काहीच भूमिका नाही.
बातम्या आणखी आहेत...