आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना काळात पहिल्यांदाच संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. इतिहासात प्रथमच लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज वेगवेगळ्या वेळेत पार झाले. कोरोना प्रोटोकॉलनुसार प्रवेशापासून ते सभागृहाच्या कामकाजापर्यंत पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, खासदार, कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी मास्क घातलेले दिसून आले. लोकसभा सचिवालयानुसार, पहिल्या दिवशी लोकसभेच्या कामकाजात ३५९ सदस्यांनी भाग घेतला. सहा फुटांचे अंतर पाळण्यासाठी लोकसभेच्या सदस्यांची आसनव्यवस्था राज्यसभेत करण्यात आली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी खासदारांना जागेवरूनच बोलण्याची परवानगी दिली. लोकसभेत चर्चेसाठी ८ विधेयके सादर करण्यात आली. आधी ११ विधेयके असतील अशी बातमी होती.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या विधेयकात कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी खासदारांच्या पगारात एका वर्षासाठी ३० टक्के कपात करण्याची तरतूद आहे. याबाबत सरकारने एप्रिलमध्ये अध्यादेश पारित केला होता. लोकसभेत सरकारने बँकिंग नियमन
अर्थमंत्री सीतारमण यांच्यावरील खासदाराच्या टीकेने गदारोळ
सभागृहात बँकिंग नियमन संशोधन विधेयक सादर केले असताना तृणमूलचे खासदार सौगत यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याने जोरदार गदारोळ झाला. अनेक सदस्यांनी त्यांच्या या विधानावर आक्षेप घेतला. सभापतींनी सांगितले, या विधानाला कामकाजातून हटवण्यात यावे. मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, रॉय यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागावी. यात काहीही असंसदीय नसल्याचे तृणमूलच्या खासदाराने सांगितले.
आता लोकसभेत होमिओपॅथी व मेडिसिन विधेयक मंजूर
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राष्ट्रीय भारतीय आयुर्विज्ञान प्रणाली आयोग विधेयक २०१९ आणि राष्ट्रीय होमिअोपॅथी आयोग विधेयक २०१९ सादर केले. ते लोकसभेत मंजूर झाले. दोन्ही गेल्या वर्षी जानेवारीत राज्यसभेत मंजूर झाले आहेत. हर्षवर्धन यांनी सांगितले की, उपचार पद्धतीचा वापर करण्यासाठी परवाना मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा, पदवीधरांसाठी एक परीक्षा देण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.