आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी बुधवारी लाेकसभेत राष्ट्रपती अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेत विरोधी पक्षांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. माेदींनी कृषी कायदे ते शेतकरी अांदाेलन या सर्वांचा उल्लेख केला. यादरम्यान गदारोळही झाला. विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभात्याग केला. यानंतर लाेकसभेत अाभार प्रस्ताव अावाजी मतदानाने मंजूर झाला.
शेतकरी अांदाेलन पवित्र आहे. मात्र अांदाेलनजीवींनी ते अपवित्र केल्याची पंतप्रधानांनी टीका केली. ते म्हणाले, ‘लोकशाहीत आंदोलनाचे महत्त्व आहे. मात्र आंदोलनजीवी पवित्र आंदोलन आपल्या लाभासाठी अपवित्र करू लागतात तेव्हा काय होते? अांदाेलनजीवींनी शेतकऱ्यांचे अांदाेलन हायजॅक केले. दंगेखोर, अतिरेकी- जे तुरुंगात आहेत, त्यांचे फोटो लावून त्यांच्या सुटकेची मागणी करणे हे शेतकरी आंदोलनाला अपवित्र करणे आहे.’ मोदी म्हणाले, कृउबासची व्यवस्था पुढेही सुरू ठेवता येऊ शकते. नव्या कायद्यांत बंधन नाही. तो एक पर्याय अाहे. कृषीत गुंतवणूक वाढल्याने राेजगारवाढ
माेदी म्हणाले, “कृषी क्षेत्रात जेवढी गुंतवणूक वाढेल राेजगाराच्या संधी तेवढ्याच वाढतील. शेतकऱ्यांच्या अडचणी कमी व्हाव्यात, ही आपली जबाबदारी आहे. जुनी विचारसरणी, जुन्या निकषांनी शेतकऱ्यांचे भले झाले असते तर ते केव्हाच व्हायला हवे होते. २१ व्या शतकात १८ व्या शतकाच्या हिशेबाने आव्हानांचा सामना केला जाऊ शकत नाही. शेतकरी दारिद्र्यात राहावा, अशी कुणाचीही इच्छा नसते. आमच्या सरकारने छोट्या शेतकऱ्यांसाठी बियाण्यांपासून बाजारापर्यंत गेल्या ६ वर्षांत खूप महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.’
न मागताच का दिले? हा तर्क प्रथमच झाला आहे
मोदी म्हणाले, “आम्ही मागितलेच नाही, तुम्ही का दिले, असा तर्क प्रथमच झाला आहे. मागणी व्हावी व सरकार काम करेल, ही सरंजामशाही नाही. नागरिकांना याचक करता येणार नाही. या देशात हुंड्याविरुद्ध कायदा, तीन तलाक, बालविवाहाविरुद्ध, मुलींना संपत्तीत हक्कांची मागणी कुणी केली नव्हती. प्रगतिशील समाजासाठी हे कायदे आवश्यक आहेत.’
खासगी क्षेत्राची भागीदारी तितकीच महत्त्वपूर्ण
काँग्रेसवर टीका करत नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी हा मार्ग का निवडला, यावर संशय येतो. काँग्रेसच्या सहकाऱ्यांना आठवण करून देतो की, सार्वजनिक क्षेत्रासारखीच खासगी क्षेत्राची भागीदारीही तितकीच महत्त्वाची आहे. “ज्यांना त्यांचा राजकीय अजेंडा लखलाभ, आम्ही देशाचा अजेंडा घेऊन मार्गक्रमण करू.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.