आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालॉन्ग कोविडचा सामना करणाऱ्या रुग्णांवर आजाराच्या परिणामांविषयी नवीन संशोधन समोर आले आहे. संशोधनानुसार, अशा रुग्णांमध्ये 10 अंगांसंबंधीत 200 पेक्षा जास्त लक्षणे दिसू शकतात. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ज्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसत आहेत, वैज्ञानिकांनी त्यांच्यावर संशोधन केले आहे. त्यांच्यात लॉन्ग कोविडचा सामना करणाऱ्या 56 देशांच्या 3,762 रुग्णांसोबत चर्चा केली गेली.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनने आपल्या संशोधनादरम्यान कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसणाऱ्या 203 मधून 66 लक्षणांवर 7 महिने नजर ठेवली. सर्व रूग्णांचे वय 18 वर्षे व त्याहून अधिक वयाचे होते आणि त्यांना कोविडशी संबंधित 257 प्रश्न विचारले गेले.
सर्व प्रथम जाणून घ्या लॉन्ग कोविड काय आहे?
लॉन्ग कोविडची कोणतीही वैद्यकीय व्याख्या नाही. सोप्या भाषेत, याचा अर्थ असा आहे की शरीरातून विषाणू गेल्यानंतरही काही लक्षणे दिसत राहणे हा आहे. कोविड -19 च्या ज्या रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यांना अनेक महिन्यांनंतरही समस्या जाणवत आहेत. कोविड -19 मधून बरे झाल्यानंतरही दिर्घकाळ लक्षणे दिसणे म्हणजे लॉन्ग कोविड आहे.
रुग्णांमध्ये थकवा, अस्वस्थता सारखे लक्षणे सामान्य
रुग्णांमध्ये सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे थकवा, अस्वस्थता आणि विचार करण्याची क्षमता कमी होणे. याशिवाय थरथरणे, खाज सुटणे, स्त्रियांच्या पीरियड्समध्ये बदल, सेक्सुअल डिस्फंक्शन, हार्ट पेल्पिटेशन, मूत्र साठवणाऱ्या मूत्राशयावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थता, स्मरणशक्ती कमी होणे, अंधुक दिसणे, अतिसार होणे, कानात आवाज ऐकायला येणे यासारखे लक्षणेही आढळून आली आहेत. .
हृदय-श्वास घेण्याव्यतिरिक्त, इतर चाचण्या देखील आवश्यक आहेत
संशोधकांचे म्हणणे आहे की कोरोना व्हायरला मात दिल्यानंतर रुग्णांना हृदय आणि श्वसन चाचणी करण्यास सांगितले जाते, परंतु लॉन्ग कोविडच्या बाबतीत, इतर काही चाचण्या केल्या पाहिजेत. यात न्यूरोसायकॅट्रिक आणि न्यूरोलॉजिकल लक्षणे पाहण्याची गरज आहे. रूग्णांमध्ये दिसणारी विविध लक्षणे, त्यांच्या शरीराच्या बर्याच भागांवर वाईट करु शकतात. केवळ त्यांची कारणे शोधूनच, रुग्णांवर योग्य उपचार केले जाऊ शकतात.
ही लक्षणे किती काळ राहतील, हे सांगणे कठीण आहे
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील न्यूरो सायंटिस्ट एथेना अक्रमी सांगतात की अशा रुग्णांमध्ये कोणत्या प्रकारचे लक्षणे दिसतील याबद्दल फारच कमी माहिती मिळाली आहे. हे असे आहे कारण जसे जसे वेळ जातो तसतसे लक्षणे दिसू लागतात. ते किती गंभीर असतील आणि दैनंदिन जीवनावर त्याचा कसा परिणाम होईल हे देखील नंतर कळते.
आतापर्यंतच्या संशोधनात असे दिसून आले आहे की लॉन्ग कोविडच्या बाबतीत, 35 आठवड्यांनंतर लक्षणे दिसू शकतात. हे होण्याचा धोका 91.8% पर्यंत राहतो. संशोधनात सामील झालेल्या3,762 रुग्णांमधून 3,608 म्हणजेच सुमारे 96% रुग्णांमध्ये असे लक्षणे 90 दिवसानंतरही दिसत राहिले. त्याच वेळी, 65% रूग्ण होते ज्यांच्यात लक्षणे 180 दिवसांपर्यंत दिसू लागले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.