आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेईई म्हणजे संयुक्त प्रवेश परीक्षा देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा म्हटली जाते. मात्र, कॉपीच्या दृष्टीने फुलप्रूफ म्हटल्या जाणाऱ्या परीक्षेत फेरफार करून प्रवेशाच्या घोटाळ्याची सध्या सीबीआय चौकशी सुरू आहे. तपास संस्थेने काही लोकांना पकडले आहे. फेरफार कसा झाला आणि कोण त्यात सामील होते, हे पूर्ण चौकशीनंतरच समोर येईल. मात्र, दैनिक भास्करच्या पडताळणीत दिसते की, सध्याच्या प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा केंद्रांची निवड प्रक्रियाच सर्वात मोठी त्रुटी आहे, त्याद्वारे गोंधळाची शक्यता आहे. तांत्रिकदृष्ट्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने त्यांचे परीक्षा साॅफ्टवेअर अभेद्य करण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र, परीक्षा केंद्रावरील संगनमताद्वारे या सॉफ्टवेअरमध्येही मागील दाराने चोरी करता येते. या प्रकरणात दिसते की, परीक्षा केंद्रात बसलेल्या परीक्षार्थीचे कॉम्प्युटर रिमोट अॅक्सेसद्वारे लांबून नियंत्रित केले जात होते.
परीक्षा सॉफ्टवेअर इन्स्टॉल होताच इतर अॅक्सेस बंद झाले तरी आधीच ट्रोझन व्हायरस टाकून होते चोरी
एनटीएने ऑनलाइन परीक्षांसाठी ज्या पद्धतीचे सॉफ्टवेअर तयार केले आहे ते सामान्य स्थितीत अभेद्यच आहे. कोणत्याही यंत्रणेला रिमोट अॅक्सेसवर घेणे म्हणजे लांबून नियंत्रण करण्यासाठी ‘एनीडेस्क’ व ‘टीम व्ह्यूअर’ सारखे साॅफ्टवेअर आहेत. मात्र, एनटीएचे साॅफ्टवेअर सर्व रिमोट अॅक्सेस साॅफ्टवेअर ब्लॉक करते.
हॅकर वापरतात ट्रोझन व्हायरस
सायबर सिक्युरिटी कंपनी सायबर रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (क्रॉ)चे संचालक मोहित यादव यांच्या नुसार, परीक्षेत चोरीसाठी हॅकर्सने ट्रोझन व्हायरस अॅप्लिकेशन वापरले असेल. हा व्हायरस यंत्रणेत निष्क्रिय पडलेला असतो. योग्य वेळी हॅकर तो सक्रिय करतो आणि ते हिडन बॅकडोअर, कॉम्प्युटरच्या सिक्युरिटी मेकॅनिझमला टाळून रिमोट अॅक्सेस देतो.
परीक्षा केंद्र दुबळा धागा का?
यंत्रणेत ट्रोझन व्हायरस अॅप्लिकेशन टाकण्यासाठी तपासणी आधीच त्यात ट्रोझन व्हायरस अॅप्लिकेशन टाकणे गरजेचे असते. केंद्रावरील कोणीतरी हातमिळवणी केली तरच हे शक्य होते. एनटीएच्या ऑफलाइन परीक्षांसाठी सामान्यपणे सीबीएसईशी संबद्ध शाळांना परीक्षा केंद्र केले जाते. ऑनलाइन परीक्षांसाठी शेकडो कॉम्प्युटर असलेल्या केंद्रांची गरज असते. म्हणून खासगी संस्था व कंपन्यांमध्ये परीक्षा केंद्र बनवले जातात. पुरेशी साधने असलेल्या कंपन्यांना एनटीए विनंती करते. मान्यता मिळाल्यानंतर एनटीए केंद्राची पाहणी व तांत्रिक पडताळणी करते. मात्र, केंद्र संचालक संस्थेची कसून चौकशी होत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.