आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भरुचजवळील अंकलेश्वर येथील फायनान्स कंपनी इंडिया इन्फोलाइन फायनान्स लि.च्या शाखेत मास्क घालून आलेल्या चोरट्यांनी सोमवारी दरोडा टाकला. फक्त ११ मिनिटांत या चाेरट्यांनी आधी ओटीपी व पासवर्ड मागवून स्ट्राँग रुम उघडले. तेथे असलेले ६६८ तोळे सोने आणि सुमारे १.७९ कोटी रुपये रोख रक्कम त्यांनी लांबवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ३.३१ कोटी रुपयाची लूट झाली. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी राज्यांत अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
ही घटना इंडिया इन्फोलाइन फायनान्स लि. मध्ये घडली. चोरट्यांनी सोमवारी सकाळी फायनान्स ऑफिस उघडण्याच्या ४५ मिनिटे आधी प्रवेश केला होता. ठरलेल्या वेळेनुसार कर्मचारी कामावर आले तेव्हाच पहिला चोरटा घुसला. त्याच्या पाठोपाठ अन्य चोरटेही शिरले. बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी ३ महिलांसह ५ कर्मचाऱ्यांना बंधक बनवले. नंतर मुख्य शाखेतून ओटीपी व पासवर्ड मागवून स्ट्राँग रूम उघडली. तेथे ठेवलेले सोने आणि चांदीची दागिने व रोख रक्कम घेऊन ते पळून गेले. शाखाधिकारी धर्मेंद्र पढियार यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर दरोड्याचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेजद्वारे डीएसपी राजेंद्रसिंग चुडासामा यांनी मुंबईची टोळी असल्याचा दावा केला.
३ कर्मचारी असले तरच उघडते कार्यालयाचे गेट
सुरक्षा उपाययोजनेनुसार तीन कर्मचारी एकत्र आले तरच कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार उघडते. साेमवारी सकाळी ९.१७ वाजता कर्मचारी आले. तेवढ्यात चोरटेही दाखल झाले. त्यांनी दोन महिलांसह अन्य कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवले. त्यानंतर स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडून घेतला आणि तेथील ६६८ तोळे सोने आणि १.७९ कोटी रुपये रोख रक्कम पळवली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.