आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टआध्यात्म:द्वारकेत ‘देवभूमी कॉरिडॉर’चा गोकुळाष्टमीपासून श्रीगणेशा; काशी-महालोक, मथुरेनंतर चौथा कॉरिडॉर

द्वारका / देवेंद्र भटनागर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामसेतू 'सिग्नेचर' ब्रिजचे काम सुरू. - Divya Marathi
रामसेतू 'सिग्नेचर' ब्रिजचे काम सुरू.

काशी विश्वनाथ, महाकाल लोक व मथुरा कॉरिडॉरनंतर द्वारकेत देवभूमी कॉरिडॉर होणार आहे. हे पश्चिम भारतातील सर्वात मोठे आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित होईल. यातून द्वारकेचा चेहरामोहरा पालटेल. शिवराजपूर समुद्रकिनाराही विकसित होणार आहे. द्वारका-पोरबंदर-सोमनाथ लिंक प्रोजेक्टही सुरू होईल. सोमनाथच्या जवळ श्रीकृष्णाने देहाचा त्याग केला होता. द्वारकेपासून १३ किलोमीटर अंतरावरील शिवराजपूर किनारा व २३ किमीवरील आेखा किनाऱ्याचा कायापालट करण्याची योजना आहे. गोकुळाष्टमीपासून (६-७ सप्टेंबर) कॉरिडॉरचे काम सुरू होईल.

असे असेल विकासाचे द्वार (का) कॉरिडॉर 1. बेट द्वारकेत गॅलरी करणार बेट द्वारकेचे रूपांतर जागतिक पातळीवर करण्याची तयारी आहे. पहिल्या टप्प्यात १३८ कोटी रुपये खर्च होतील. येथील पर्यावरणपूरक पर्यटन, वॉटर स्पोर्ट््स, मरीन इंटरप्रिटेशन सेंटर, लेक फ्रंट, डॉल्फिन व्ह्यूइंग गॅलरीसह अनेक प्रकल्प सुरू होतील. बुडालेली द्वारकानगरी पाहण्यासाठी विशेष गॅलरी बनवणार आहेत. 2. काशीच्या अस्सी घाटासारखे गोमतीच्या ९ घाटांचा विकास- निष्पाप कुंडापासून संगम घाटापर्यंत. गोमतीचा संगम समुद्रात होतो म्हणून तो संगम घाट. घाटांच्या किनारी वॉक-वे असतील. यातून हिरवाई वाढेल. 3. द्वारकेतील सगळी मंदिरे जोडणार महाकालच्या धर्तीवर द्वारकेत द्वारकाधीश मंदिरापासून द्वारका, ज्योतिर्लिंग नागेश्वरपर्यंत सर्व मंदिरांना जोडले जाणार आहे. त्यात द्वारकाधीश मंदिर, रुक्मिणी-बलराम मंदिर, सांवलियाजी मंदिर, गोवर्धननाथ मंदिर, महाप्रभू बैठक, वासुदेव, हनुमान मंदिरापासून नारायण मंदिरापर्यंतचा समावेश आहे. 4. ऋषी दुर्वासांचा वृक्ष, गोपी तलावाचे रुपडे पालटणार लक्ष्मीनारायण मंदिरातील अंगणात ऐतिहासिक झाड आहे. ऋषी दुर्वासा यांनी तेथे तपस्या केली होती. पर्यटकांसाठी हे झाड आकर्षण ठरणार आहे. गोपी तलावाचेही बांधकाम होणार आहे. महाभारतानंतर सर्व गोपिका याच तलावात सामावल्या होत्या. याच तलावातील मातीला गोपीचंदन म्हटले जाते. 5. द्वारकेला जोडेल रामसेतू ‘सिग्नेचर’ ब्रिज आेखाहून बेट द्वारकेला जाेडणारा सिग्नेचर ब्रिजचे काम सुरू आहे. २३२० मीटर लांब या चौपदरी मार्गाला देशातील सर्वात लांब केबल स्टे ब्रिज म्हटले गेले आहे. त्यावर ८७० कोटी रुपये खर्च झाले आहेत. 6. द्वारकाधीशाच्या मूर्तीवर साउंड अँड लाईट शो भगवान द्वारकाधीशाच्या रुपातील १०८ फुटांची मूर्ती तयार केली जाईल. ही कृष्णाची सर्वात उंची मूर्ती म्हटली जाते. ही मूर्ती गोमती किनारी पंचकुई क्षेत्रात उभारली जाईल. जन्माष्टमीला भूमीपूजन होईल. मूर्तीवर द्वारकेचा इतिहास, संस्कृती, धार्मिक महत्त्व स्पष्ट करण्यासाठी साउंड अँड लाईट शो होईल. 7. शिवराजपूरमध्ये वॉटर स्पोर्ट्स, टेन्टसह अनेक मोठी कामे शिवराजपूर समुद्र किनाऱ्याला देशातील सर्वाेत्तम समुद्र किनारा या रुपात आेळखले जाते. त्यास ब्लू फ्लॅग सन्मानही मिळाला. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे व्यापक पातळीवर काम केले जात आहे. वॉटर स्पोर्ट्ससोबत शहराजवळ टेंट सिटी बनवण्याचे काम सुरू झाले आहे. अराईव्हल प्लाझा, सायकल ट्रॅक, इव्हेंट ग्राऊंड, मनोरंजन थिएटर, फोर्ट रिस्टोरेशन, लाइफ गार्ड ट्रावरवर ५५ महत्त्वाचे कामे सुरू झाले आहेत.