आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फीच्या नादात मृत्यू; VIDEO:2 तरुण नालंदात मालगाडीवर चढून घेत होते सेल्फी, हायटेंशन तारेच्या संपर्कात आल्याने होरपळले

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नालंदामधून एक थक्क करणारा व्हिडिओ उजेडात आला आहे. मालगाडीच्या अपघातानंतर 2 तरुण ट्रेनच्या डब्यावर चढून सेल्फी घेत होते. तेव्हा अचानक दोघेही हायटेंशन तारेच्या संपर्कात आले. त्यातील एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसरा अत्यंत वाईट पद्धतीने होरपळला आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ दूर उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलद्वारे रेकॉर्ड केला आहे. घटना बुधवारची आहे. रुळावरून घसरलेल्या एका मालगाडीच्या बोगीवर चढून 2 तरुण सेल्फी काढण्याच्या हायटेंशन तारेच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे.

मालगाडीवर उभे राहून सेल्फी घेणारे 2 तरुण.
मालगाडीवर उभे राहून सेल्फी घेणारे 2 तरुण.

रुळावरुन घसरले होते 9 डबे

नालंदातील फतुहा इस्लामपूर रेल्वे विभागातील एकंगसराय रेल्वे स्थानकालगत एका मालगाडीचे 9 डबे रुळावरुन घसरले होते. या डब्यांवर सेल्फी घेण्याच्या नादात एका युवकाचा बळी गेला. राजेंद्र हलवाई (16) असे मृत, तर छोटू कुमार जखमी तरुणाचे नाव आहे. जखमी तरुणाला पुढील उपचारांसाठी पाटण्याला हलवण्यात आले आहे.

सेल्फी घेण्याच्या नादात दोन्ही तरुण हायटेंशन लाइनच्या संपर्कात आले.
सेल्फी घेण्याच्या नादात दोन्ही तरुण हायटेंशन लाइनच्या संपर्कात आले.

या घटनेचा व्हिडिओ गुरूवारी उजेडात आला. त्यानंतर तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

दुर्घटनेनंतर मृतदेह काहीवेळ मालगाडीवरच पडून राहिला. त्यानंतर तो खाली आणण्यात आला.
दुर्घटनेनंतर मृतदेह काहीवेळ मालगाडीवरच पडून राहिला. त्यानंतर तो खाली आणण्यात आला.

सदर मालगाडी कोळसा घेऊन इस्लामपूरहून फतुहाकडे जात होती. पण रस्त्यात एकंगसराय रेल्वे स्थानकालगत तिचे 9 डबे रुळावरुन घसरले.

बातम्या आणखी आहेत...