आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Love Jihad Case Update; Bombay High Court On Boy And Girl Different Religion | Mumbai News

केवळ धर्म वेगळा असणे लव्ह जिहाद नव्हे:मुंबई HC चा निर्वाळा; फिर्यादीचा आरोप - एक्स गर्लफ्रेंडने सुंता केला, इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ मुलगा व मुलगी वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे त्यांच्या नात्याला धार्मिक अँगल देता नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणात नोंदवले. या प्रकरणी एका व्यक्तीने (एक्स बॉयफ्रेंड) महिला व तिच्या आई-वडिलांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा व आपला सुंता केल्याचा आरोप केला होता.

हायकोर्टाने महिला व तिच्या आई-वडिलांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना हे मत नोंदवले. या प्रकरणाची सुनावणी 26 फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती विभा कंकनवाडी व न्यायमूर्ती अभय वाघवासे यांच्या खंडपीठापुढे जाली. पण त्याची बातमी शुक्रवारी उजेडात आली.

एक्स गर्लफ्रेंडवर केला होता लव्ह जिहादचा आरोप

व्यक्तीने डिसेंबर 2022 मध्ये एक्स गर्लफ्रेंड व तिच्या कुटुंबीयांवर लव्ह जिहादचा गुन्हा दाखल केला होता. त्याने सांगितले होते की, वर्ष 2018 पासून तो एका मुस्लिम महिलेसोबत नात्यात होता. तो अनुसूचित जातीचा ( एससी) होता. पण महिलेला त्याची कल्पना नव्हती. काही दिवसांनंतर महिलेने व्यक्तीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तेव्हा व्यक्तीने महिलेच्या आई-वडिलांना आपली जात सांगितली.

व्यक्तीच्या मते, महिलेच्या आई-वडिलांना त्याच्या जातीची कोणतीही समस्या नव्हती. त्यांनी त्यांच्या मुलीलाही धर्मांतर न करता माझा स्वीकार करण्यासाठी समजूत काढली. त्यानंतर आमच्या नात्यात दुरावा आला. त्यानंतर मी महिला व तिच्या आई-वडिलांविरोधात धर्म बदलण्यासाठी दबाव टाकणे, सुंता करणे व पैसे मागण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. व्यक्तीने आपल्या एक्स गर्लफ्रेंड व तिच्या कुटुंबावर जातीच्या नावाने गैरवर्तन करण्याचाही आरोप केला आहे.

औरंगाबाद विशेष न्यायालयाने दिला नव्हता जामीन

या प्रकरणी औरंगाबाद विशेष न्यायालयाने महिला व तिच्या कुटुंबीयांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टाचे दार ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायलायाने या प्रकरणाची सुनावणी करताना या प्रकरणाला लव्ह जिहादचे रुप देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मत व्यक्त केले. कोर्ट म्हणाले - या प्रकरणाला लव्ह जिहादचा अँगल देण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2 व्यक्ती एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा लव्ह जिहादची शक्यता कमी असते.

कोर्ट म्हणाले की, गुन्हा 2022 मध्ये दाखल झाला होता. एफआयआरमध्ये व्यक्तीने आपले महिलेवर प्रेम असल्याचे कबूल केले होते. त्यामुळे स्वतः पीडित असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला आपले महिलेसोबतचे नाते संपुष्टात आणता आले असते. पण त्याने तसे केले नाही.

मेडिकल रिपोर्टमध्ये सुंता केल्याची गोष्ट सिद्ध झाली नाही

उच्च न्यायालयाने म्हटले की, FIR मध्ये व्यक्तीने आपला सुंता करण्यात आल्याचा दावा केला. पण ती गोष्ट वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाली नाही. सुंता नैसर्गिक होता की सर्जिकल प्रोसेसद्वारे झाला हे वैद्यकीय तज्ज्ञांना सांगता आले नाही.

या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, पोलिस लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी महिला व तिच्या कुटुंबीयांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे कोर्टाने सर्वांनाच जामीन मंजूर केला.

सुंता म्हणजे काय?

मुस्लिम व यहुदी समुदायात जन्मलेल्या मुलांना सुंता करण्यात येतो. त्यात त्यांच्या लिंगाची फोरस्किन म्हणजे वरच्या भागाची स्किन कापून टाकली जाते. हेल्थलाइन वेबसाइटच्या एका आर्टिकलनुसार, यावेळी मुलांना खूप वेदना सहन कराव्या लागतात. पण 7 ते 10 दिवसांच्या आत ते बरेही होतात.

सुंता पुरुषांसाठी सुंता चांगला, पण महिलांसाठी वाईट

मुलांमध्ये सुंता करण्याचे अनेक फायदे असतात. सुंता केल्याने त्यांची हायजिन चांगली होते. सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज, पेनाइल कँसर, सर्व्हिकल कँसर व यूरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो. याशिवाय प्रायव्हेट पार्टशी संबंधित बॅलेनाइटिस, बालनोपोस्टहायटिस, पॅराफिमोसिस व फिमोसिस सारख्या आजारांवर उपचार करण्यासाठीही मुलांची सुंता केली जाते.

याऊलट महिलांचा सुंता केल्याने कोणताही वैद्यकीय फायदा होत नाही. केवळ नुकसानच होते. WHO च्या माहितीनुसार, महिलांची सुंता केल्यानंतर त्यांना भयंकर वेदनांसह रक्तस्त्राव, सूज, ताप, इन्फेक्शन, घाव न भरणे शॉक लागल्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

महिलांचा सुंतासंबंधीची खालील बातमी वाचा...

चॉकलेटच्या बहाण्याने आजीकडून नातीची सुंता:लैंगिक इच्छा दाबण्याच्या नावाखाली बोहरा मुस्लिमांच्या मुलींबाबत भयावह प्रथा

"मी सात वर्षांची होते. आजी म्हणाली चल फिरायला जाऊया. मी तुला चॉकलेट देते. मी आनंदाने उड्या मारू लागले. मला आज खूप मजा येईल. आजी मला एका अनोळखी खोलीत घेऊन गेली. काही लोकांनी माझे हात पाय घट्ट पकडून ठेवले होते. मी काही बोलायच्या आधीच माझ्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केला. मी वेदनेने किंचाळले, मला वाटले माझा जीव गेला. 48 वर्षांनंतरही ते दृश्य आठवून आजही थरकाप उडतो.' येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...