आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Love Jihad In UP : Dharm Parivartan Kanoon Clears By Governor Anandiben Patel If Found Guilty Can Be Punished Up To 10 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपीमध्ये लव्ह जिहादविरोधात अध्यादेश़:धर्मांतराच्या अध्यादेशास राज्यपालांची मंजूरी, दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंतची होऊ शकते शिक्षा

लखनऊ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लव्ह जिहादविरोधात मध्यप्रदेश, बिहार, कर्नाटक, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात कायदा आणण्याची तयारी

उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधातील कायद्याला शनिवारी राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी मंजूरी दिली. राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर आता लव्ह जिहाद गुन्हेगारीच्या श्रेणीत आला आहे. याअंतर्गत दोषी ठरल्यास 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. याआधी यूपी सरकारने 24 नोव्हेंबर रोजी धर्मांतराविरूद्ध अध्यादेश पास केला होता.

20 नोव्हेंबर रोजी राज्याच्या गृह मंत्रालयाने आपला प्रस्ताव न्याय व कायदा विभागाकडे पाठविला होता. यानुसार, यानुसार अशा प्रकरणांमध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात देखील या विषयावर कायदा करण्याची तयारी सुरू आहे.

यूपीच्या कायदा आयोगाचे प्रमुख आदित्यनाथ मित्तल म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने धर्माशी संबंधित स्वातंत्र्य दिले आहे, परंतु काही संस्था त्याचा गैरवापर करीत आहेत. अशा संस्था धर्म बदलण्यासाठी लोकांना विवाह, नोकरी आणि चांगल्या जीवनशैलीचे लालूच देतात. आम्ही याविषयावर 2019 मध्ये मसुदा सादर केला होता. यामध्ये आतापर्यंत 3 वेळा बदल केले आहेत. शेवटच्या बदलामध्ये आम्ही शिक्षेची तरतूद जोडली आहे.

असा आहे लव्ह जिहादविरूद्धच्या कायद्याच्या मसुदा

> दिशाभूल करून, खोटे बोलून, आमिष देऊन, जबरदस्तीने किंवा लग्नासाठी धर्मांतर केल्याचा दोषी आढळल्यास किमान 1 वर्ष आणि कमाल 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच आरोपीला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.

> जर महिला एससी / एसटी प्रवर्गातील असेल आणि तिचे सक्तीने किंवा खोटे बोलून धर्मांतरण करणे कायद्याचे उल्लंघन मानले जाईल. याबाबतीत किमान 3 वर्ष आणि कमला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

> सामूहिक धर्मांतराच्या बाबतीत कमीतकमी 3 वर्षे आणि जास्तीत जास्त दहा वर्षे शिक्षा होऊ शकते. तसेच दंडाची रक्कम 50 रुपयांपर्यंत असेल.

> कोणाला धर्म बदलवायचा असेल तर त्याने दोन महिन्यांपूर्वी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सूचना द्यावी. असे न केल्यास 6 महिने ते 3 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. दंडाची रक्कम 10 हजार रुपये राहिल.

धर्मांतरासाठी होणारे विवाह देखील या कायद्यांतर्गत येणार

मसुद्यानुसार, धर्मांतराच्या प्रकरणात आई-वडील, भाऊ-बहीण किंवा इतर नातेवाईकांनी तक्रार केल्यास कारवाई होऊ शकते. धर्मांतरासाठी दोषी ठरल्यास एका वर्षापासून दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. लव्ह जिहाद सारख्या प्रकरणांमध्ये मदत करणार्‍यांनाही मुख्य आरोपी केले जाईल. दोषी आढळल्यास त्यांनाही शिक्षा होईल. अध्यादेशानुसार, लग्न लावणारा भटजी किंवा मौलवीला त्या धर्माचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser