आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीपासून वाचण्यासाठी देशभर पळाला:पिच्छा सोडवण्यासाठी रेल्वेतूनही उडी मारली, पण अखेर तिने गाठलेच; पोलिसांनी लावले लग्न

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडू सध्या बिहारी मजुरांच्या पलायनामुळे चर्चेत आले आहे. पण आता एक अशी आगळीवेगळी घटना उजेडात आली आहे. या घटनेला तामिळनाडूची प्रेम कहाणी असे नाव देता येईल. या कहाणीतील मुलगी ओडिशाची, तर मुलगा बिहारच्या सीतामढीचा आहे. दोघांची प्रेमकहाणी तामिळनाडूत काम करताना सुरू झाली. 5 महिन्यांपूर्वी मतभेद झाल्यामुळे मुलगा मुलीचा पिच्छा सोडवण्यासाठी 4 वेळा पळून गेला. पण प्रत्येकवेळी मुलीने त्याला शोधून काढले. आता त्या दोघांचे दोनाचे चारहात झालेत, म्हणजे त्यांचे लग्न झाले आहे.

येथून पळाला...तेथूनही पळाला...

बिहारचा हा मुलगा मुलीचा पिच्छा सोडवण्यासाठी प्रथम लुधियानाला पळून गेला. पण मुलीने लुधियानातील त्याच्या भावाचे घर गाठून त्याला परत आणले. तेथून तो पुन्हा वाराणसीला पळून गेला. मुलीने तेथूनही त्याला शोधून काढले. विशेष म्हणजे हा मुलगा तेथून पुन्हा रेल्वेने पळून गेला. आश्चर्य म्हणजे त्यानंतरही मुलीने त्याचा पाठलाग सोडला नाही. त्यामुळे त्याने थेट धावत्या रेल्वेतून उडी मारली. त्याचे हात-पाय मोडले. मुलीने त्याला घरी आणले. त्यानंतरही हा मुलगा अचानक पळून गेला. अखेरीस मुलीने पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांचे लग्न लावून दिले.

मुलगा बिहारचा, तर मुलगी ओडिशाची आहे.
मुलगा बिहारचा, तर मुलगी ओडिशाची आहे.

मुलीच्या विनवणीनंतर सीतामढी पोलिसांनी दोघांचे परस्पर सहमतीने लग्न लावून दिले. पोलिसांच्या उपस्थितीत ठाणे परिसरातील महादेव मंदिरात पारपंरिक पद्धतीने दोघांचे लग्न झाले. वराचे नाव चंदन ठाकूर (22) तर वधूचे नाव सुनीता (21) असे आहे. मुलगा सीतामढीच्या सोनबरसा ठाणे हद्दीतील पिपरा परसाइन येथील आहे. तर मुलगी ओडिशाच्या जासपूर नीला भागातील चांदीखन गावची आहे.

काय आहे प्रकरण

सुनीताने पोलिसांना सांगितले की, तिचे गत वर्षभरापासून चंदनसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. इंटरमीडिएटच्या परीक्षेनंतर सुनीता आर्थिक तंगीमुळे गतवर्षी मार्च महिन्यात तामिळनाडूच्या तिरुपूर येथील एका कारखान्यात काम करण्यासाठी गेली होती. तिथे तिची भेट चंदन ठाकूरशी झाली.

दोघांच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. दोघांनी एकमेकांसोबत जगण्यामरण्याच्या शपथाही खाल्ल्या. पण 5 महिन्यांतच कोणत्या तरी गोष्टीवरून त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला. त्यानंतर चंदनने आपल्या प्रेयसीला तिच्या गावी सोडून पळ काढला.

सुनीताने पोलिसांना सांगितले की, तिचे चंदनसोबत मागील वर्षभरापासून प्रेम प्रकरण सुरू आहे.
सुनीताने पोलिसांना सांगितले की, तिचे चंदनसोबत मागील वर्षभरापासून प्रेम प्रकरण सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच सुनीताने चंदनचे घर गाठले. आपल्या प्रेयसीला पाहून चंदनने घरातून पळ काढला. तो थेट आपल्या लुधियानातील भावाच्या घरी पोहोचला. सुनीताने तेथूनही त्याला शोधून काढले. तिथे दोघांनी एकत्र घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण रस्त्यातच त्याने बनारस रेल्वे स्थानकातून रेल्वेतून उडी मारून पळ काढला. यावेळी त्याच्या उजव्या हाताला जबर जखम झाली. यामुळे त्याला स्टेशनवरून पळून जाता आले नाही.

पोलिसांनी दोघांचे लग्न लावले

त्यानंतर सुनीता समोरच्या स्टेशनवर उतरली. तिने पुन्हा चंदनला शोधून काढले. त्यानंतर दोघेही सुखरुप घरी परतले. पण होळीच्या एक दिवस अगोदर अचानक दोघांत एका गोष्टीवरून भांडण झाले. यामुळे चंदन पुन्हा घराला टाळे ठोकून पळून गेला. यामुळे अखेर सुनीताने पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तिची व्यथा ऐकूण चंदनचा शोध घेतला. एवढेच नव्हे तर दोघांचे हिंदू रितीरिवाजाने लग्नही लावून दिले.

या प्रकरणी ठाणे अंमलदार सुबोध कुमार यांनी सांगितले की, चंदनला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. मुलगी आमच्याकडे तक्रार घेऊन आली होती. तपासानंतर दोन्ही प्रेमी युगल लग्नासाठी तयार झाले. त्यांच्या कुटुंबीयांचीही त्याला परवानगी होती. त्यानुसार आम्ही पोलिसांच्या उपस्थितीत हिंदू रितीरिवाजाप्रमाणे त्यांचे लग्न लावून दिले.

बातम्या आणखी आहेत...