आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • LPG Cylinder ; You Are Not Getting Subsidy On Gas Cylinder, You Can Easily Find Out Sitting At Home; News And Live Updates

कामाची गोष्ट:तुम्हाला गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळत आहे की नाही, घरी बसून सहजपणे शोधू शकता? त्यासाठी 'या' टिप्सला करा फॉलो

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांनी अशाप्रकारे करावे चेक

जगभरात गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु, काही लोकांना आपल्या गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळत आहे की नाही? हे माहित नसते. यावितिरिक्त किती रुपये गॅस सबसिडी म्हणून मिळते याचीदेखील माहिती नसते. जर तुम्हाला याची माहिती नसेल तर काळजी करु नका. आम्ही तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहे की नाही? याची माहिती देणार आहोत. या टिप्सव्दारे तुम्ही घरबसल्या सहजपणे शोधू शकता.

इंडेनच्या ग्राहकांनी अशाप्रकारे चेक करावे खाते?

 • सर्वात आधी मोबाईल क्रोममध्ये गेल्यावर www.mylpg.in हे टाइप करावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल. तुमचा जो कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर असेल त्याच्या फोटोवर टॅप करा.
 • आता उघडलेल्या विंडोमध्ये 'Give your feedback online' वर क्लिक करा.
 • यानंतर पुढील पान उघडेल जिथे तुम्हाला सिलेंडरच्या चिन्हावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर पुढील पृष्ठावर 'Subsidy Related (PAHAL) वर क्लिक केल्यावर तुम्हाला उजव्या बाजूला 3 पर्याय मिळतील.
 • यामध्ये 'Subsidy not received' वर क्लिक केल्यावर पुढील पृष्ठ उघडेल जिथे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयडी भरावा लागेल आणि सबमिट करावे लागेल.
 • आता तुम्ही शेवटच्या 5 सिलिंडरसाठी किती पैसे दिले आणि किती पैसे मिळाले, हे समोर येईल.
 • जर तुम्हाला सबसिडी मिळाली नसेल तर तुम्ही खाली 'सिलेक्ट' पर्यायावर क्लिक करून तुमची तक्रार नोंदवू शकता.

HP आणि भारत गॅसच्या ग्राहकांनी असे चेक करावे?

 • सर्वात आधी www.mylpg.in या संकेतस्थळावर जा.
 • यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल. तुमचा जो कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर असेल त्याच्या फोटोवर टॅप करा.
 • यानंतर आलेल्या पुढील पेजवर तुम्हाला रेजिस्ट्रेशन करावे लागेल. जर तुम्ही पहिल्यांदा वेबसाईटवर आले असाल तर तुम्हाला 'new user' वर क्लिक करावे लागेल.
 • येथे आपल्याला कस्टमर नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून 'continue' वर क्लिक करा.
 • यानंतर आपल्याला युझर आयडी आणि पासवर्ड जनरेट करावे लागेल.
 • युझर आयडी आणि पासवर्ड जनरेट केल्यानंतर तुम्हाला 'Sign in' करावे लागेल.
 • त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्डसह कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि 'Login' वर क्लिक करा.
 • आता डाव्या बाजूला तुम्हाला 'view cylinder booking history' वर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर, तुम्ही सिलिंडरसाठी किती पैसे दिले आणि किती पैसे मिळवले हे समोर येईल.
 • जर तुम्हाला अनुदान मिळाले नसेल तर तुम्ही complaint/feedback क्लिक करून तुमची तक्रार नोंदवू शकता.

यामुळे थांबू शकते सबसिडी?
जर तुम्हाला एलपीजीवर सबसिडी मिळत नसेल तर तुमचे आधार कार्ड लिंक नाही. एलपीजीचे अनुदान राज्यांमध्ये वेगळे आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना कुठलेही अनुदान दिले जात नाही. कारण 10 लाख रुपयांचे हे वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांच्या उत्पन्नासह एकत्र केले जाते. त्यामुळे यांना त्यांचा लाभ घेता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...