आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाईमुळे त्रस्त लोकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे. बुधवारपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ५० रुपयांनी वाढली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ३५० रुपयांनी वाढ झाली आहे. ईशान्येकडील तीन राज्यांत विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लगेच किमती वाढवल्याचा विरोधकांनी तीव्र विरोध केला आहे.
८ महिन्यांनी झालेल्या भाववाढीनंतर दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत १,०५३ रुपयांवरून १,२०३ रुपये झाली आहे. १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर २,११९.५० रुपयांत मिळेल. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शन असलेल्या ९.५८ कोटी गरिबांना सरकार सिलिंडरमागे २०० रुपये सबसिडी देते. त्यांच्यासाठी घरगुती गॅसची किंमत सिलिंडरमागे ९०३ रुपये असेल. दुसरीकडे, पेट्रोलियम कंपन्यांनी विमान इंधनाच्या किमती ४ टक्क्यांनी कमी केल्या. हे इंधन ४,६०६.५० रुपयांनी कमी होऊन १,०७,७५०.२७ रुपये प्रति किलोलिटरप्रमाणे मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.