आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lucknow PUBG Murder Case Updates । Police Had Made Up A False Story To Save Builder, The Son Himself Revealed

PUBG हत्याकांड:आरोपी मुलगा म्हणाला- आई बिल्डरला भेटायची, म्हणून मारले; बिल्डरला वाचवायला पोलिसांनी रचली कहाणी

लखनऊ, लेखक: सुनील कुमार मिश्रा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊमधील PUBG हत्याकांडात धक्कादायक खुलासा झाला आहे. आई साधना सिंहच्या हत्येमागे PUBG गेम हे कारण नव्हते. ही थेअरी पोलिसांनी रचली आहे. एका मोठ्या बिल्डरची घरात ये-जा असल्याने मुलगा त्रस्त झाला होता. त्याने आसनसोलमध्ये पोस्टिंगवर असलेल्या त्याच्या लष्करातील वडिलांनाही आईची बिल्डरसोबतची मैत्री सांगितली होती.

वडील म्हणाले, 'मी तिथे असतो तर बिल्डर आणि तुझी आई दोघांनाही गोळ्या घातल्या असत्या. आता तुला जे वाटेल ते कर.' वडिलांच्या या इशाऱ्यानंतर मुलाने आईच्या हत्येचा कट रचला. यादरम्यान बिल्डरच्या घरी सतत भेटीगाठी सुरू होत्या. 4 जूनच्या रात्री 16 वर्षांच्या मुलाने आईवर गोळ्या झाडल्या.

साधना हिच्या हत्येनंतर बिल्डरचे नाव येऊ नये, यासाठी पोलिसांनी PUBGची थेअरी रचली. मात्र, बालसुधारगृहात आरोपी मुलाला भेटून परतलेल्या कुटुंबातील एका सदस्याने दिव्य मराठीसमोर संपूर्ण कहाणी उलगडून सांगितली.

याच खोलीत साधना यांचा मृतदेह आढळून आला. मुलाने आईवर गोळी झाडली.
याच खोलीत साधना यांचा मृतदेह आढळून आला. मुलाने आईवर गोळी झाडली.

कॉल रेकॉर्डिंगमधून बिल्डर आणि आईची मैत्री उघड

या हत्याकांडाची पार्श्वभूमी वर्षभरापूर्वीच तयार झाली होती. जेव्हा आरोपी मुलगा बनारस येथील आपल्या मामाच्या घरातून लखनऊला परत आला. आई साधना यांच्या मोबाइलमध्ये त्याने काही कॉल रेकॉर्डिंग ऐकले. यामध्ये त्याची आई एका व्यक्तीशी बोलत होती. मुलाच्या लक्षात आले की वडिलांच्या बाहेर पोस्टिंगमुळे, आई दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ गेली आहे.

मुलाला हे सहन करणे थोडे कठीण झाले. त्याने आसनसोल येथे वडील नवीन यांना फोन करून ही बाब सांगितली. त्यांना पुरावा म्हणून रेकॉर्डिंगही पाठवण्यात आलं होतं. हा तो प्रसंग होता जिथून आई आणि वडील यांच्यात भांडण सुरू झाले. वडील नवीन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आई साधना देऊ शकल्या नाहीत.

साधनाने बिल्डरला जेवायला बोलावलं, रात्री मुक्कामही केला

साधना तिच्या वैयक्तिक आयुष्यात मुलाचा हस्तक्षेप आणि पतीपासून दुरावा सहन करू शकल्या नाहीत. त्यांनी मुलाला घरात नोकर म्हणून ठेवायला सुरुवात केली. झाडू, मॉपपासून कपडे साफ करण्यापर्यंतचा भार त्यांनी मुलावर टाकला. मुलगा सर्व काही सहन करत राहिला, कारण वडील नवीन यांची पोस्टिंग आसनसोलमध्ये दूर होती. आईच्या या कृत्यांनी मुलाच्या मनात द्वेष भरला. हा सर्व प्रकार मुलगा वडिलांना फोनवर सांगत असायचा.

या प्रकरणातील हकिकत जाणून घेण्यासाठी नवीनने काही महिन्यांपूर्वी मुलगा व मुलीला नातेवाइकाच्या घरी पाठवले. आपल्यासाठी ही परीक्षा सुरू आहे याची साधनाला कल्पना नव्हती. मुले निघून गेल्यावर तिने त्याच संध्याकाळी बिल्डरला जेवायला बोलावले. रात्री बिल्डर साधनासोबतच राहिला. तिचा मुलगा आणि पती दोघांचीही तिच्यावर नजर होती याकडे साधना गाफील होती. या घटनेनंतर साधना आणि नवीन यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. मुलाच्या मनातील द्वेष आणखी वाढला.

बिल्डरच्या बर्थडे गिफ्टपासून सुरू झाला साधनाच्या हत्येचा कट

साधनेबाबत पिता-पुत्रांमध्ये नियोजन सुरू होते. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये मुलाचा वाढदिवस आला. या दिवशी बिल्डर मोठी भेट घेऊन घरी आला. नवीन आणि त्यांच्या मुलाच्या संशयाला दुजोरा मिळाल्याचा हा आणखी एक प्रसंग होता. त्या रात्री नवीनचे साधनासोबत फोनवरून भांडण झाले. पिता-पुत्राच्या मनात कारस्थान सुरू असतानाचा हा प्रसंग. ज्यानुसार साधना यांची हत्या करण्यात आली होती.

वडिलांनी लखनऊमध्ये पिस्तूल चालवणे शिकवले

भेटायला आलेल्या नातेवाईकाने मुलाला विचारले की, 'तो पिस्तूल चालवायला कसा शिकला?' त्याने उत्तर दिले, 'काही वर्षांपूर्वी पप्पांचं पोस्टिंग राजस्थानमध्ये होतं. तेव्हा सर्वजण तिथे राहत होते. आमच्या क्वार्टर्सजवळ फायरिंग रेंज होती. रोज रिहर्सल व्हायची. मी सैनिकांना गोळीबार करताना पाहायचो. आम्ही लखनऊला आलो तेव्हा माझ्या वडिलांनी मला पिस्तूल कसे वापरायचे ते शिकवले.

पप्पांना यायचे होते, पण तिकीट मिळाले नाही

ही गोष्ट पुढे नेत मुलगा म्हणाला, '3 जून रोजी माझ्या आईने मला खूप मारले होते. मी वडिलांना फोन करून सांगितले. त्यादिवशी मला वाटलं की आई जिवंत नाही राहिली पाहिजे. हे सर्व मी माझ्या वडिलांना सांगितले. त्याने काहीही न करण्यास सांगितले. 4 जूनच्या संध्याकाळपर्यंत मी त्याची वाट पाहत होतो. संध्याकाळी पप्पांचा फोन वाजला. रेल्वेचे तिकीट मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या रात्री मी माझ्या आईच्या डोक्यात गोळी झाडली."

बातम्या आणखी आहेत...