आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lucknow Rape Victim Girl Story; Jija Raped Sali | Abuse By Brother | Uttar Pradesh

ग्राउंड रिपोर्टव्यथा:4 वेळा बलात्कार अन् 3 वेळा गरोदर; मेहुणा बलात्कारी, भाऊ नको तिथे स्पर्श करायचा; आत्या म्हणायची - हे चालायचेच

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका 25 वर्षीय तरुणीवर तिच्याच मेहुण्याने सलग 7 वर्षे बलात्कार केला... आतेभाऊ तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करायचा. घाणेरडे बोलायचा. या 7 वर्षांत मुलगी तीनदा गरोदर झाली. पोट दुखायचे. ती वेदनानंनी ओरडायची. मग आत्या कोणतेतरी औषध द्यायची व तिला बरे वाटायचे. मुलीला नंतर समजले की, ते औषध गर्भपाताचे होते.

मुलीचे वडील तुरुंगात होते. त्यामुळे तिने वर्षानुवर्षे हे सर्व सहन केले. वडील बाहेर आल्यावर त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली. त्यानंतर 2 नोव्हेंबर 2021 रोजी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. मुलीच्या मेहुण्यालाही दीड महिना तुरुंगवास भोगावा लागला. पण त्यानंतर त्याला जामीन मिळाला. पीडितेच्या मते, भावाची अनेक वकील व राजकारण्यांशी मैत्री आहे. त्यांच्या मदतीने तो बाहेर पडला. पीडित मुलगी आजही न्यायासाठी न्यायालयात खेटे मारत आहे.

काय आहे तिची कहाणी? त्या 7 वर्षांत तिच्यावर काय-काय बेतले? हे सर्व जाणून घेण्यासाठी आम्ही पीडितेला भेटलो. चला तर मग जाणून घेऊया पीडितेची संपूर्ण कहाणी...

6 वर्षांची असताना आईचा मृत्यू, वडिलांनी दुसरे लग्न केले

लखनऊच्या बिजनौर पोलिस स्टेशन भागात मुलीचे घर आहे. आम्ही पोहोचताच ती बाहेर आली. उंच अंगकाठी, गुलाबी सूटावर लाल ओढणी घेतलेली... तिला पाहताच मनात याच निष्पाप मुलीवर तब्बल 7 वर्षे बलात्कार झाला का? असा विचार डोकावला...

आम्ही पीडितेशी बोलण्यास सुरुवात केली. तिने सुरुवातीलाच तिच्या मृत आईची आठवण काढली. ती म्हणाली - 2004 ची गोष्ट आहे. मी साधारण 6 वर्षांची असेल. मी, माझे 2 भाऊ व बहीण घराबाहेर खेळत होतो. दमून आत आल्यावर आई अंथरुनावर पडल्याचे दिसले. ती सहसा दिवसा झोपत नव्हती. आम्ही तिला आवाज दिला. तिने प्रतिसाद दिला नाही. तिला हलवून पाहिले असता आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आई आम्हाला कायमची सोडून गेली होती. ती बऱ्याच दिवसांपासून आजारी होती.

काही दिवस आम्ही आईच्या आठवणीत रडून काढले. मग वडिलांनी समजावले. आम्ही काही दिवस आजीच्या घरी राहिलो. तेथून घरी परतल्यानंतर वडिलांनी आमची संपूर्ण जबाबदारी घेतली. 2 वर्षे कशीतरी निघून गेली. पण काळ खूप कठीण होता. आम्ही लहान होतो. वडील आमची काळजी घेत काम करायचे. त्यामुळे वडिलांनी पुन्हा लग्न करावे, असे नातेवाईकांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी आईच्याच जवळच्या एका महिलेशी लग्न केले. 6 वर्षे सर्वकाही ठीक होते. मग एके दिवशी वडिलांवर गुन्हा दाखल झाला. वडील दोषी होते की नाही, माहीत नाही. पण त्यांना तुरुंगात डांबण्यात आले.

आत्या घरी घेऊन गेली...शाळेत टाकले, पण जाऊ दिले नाही
मुलीने सांगितले की, वडिलांना तुरुंगात टाकण्यात आले होते. मग आमची आत्या घरी आली. तिने माझ्या सावत्र आईला सांगितले की, तुला तुझी मुले आहेत. तू सर्वांचा कसा सांभाळ करणार. त्यानंतर आत्याने मला व माझ्या धाकट्या भावाला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रस्ताव मांडला. मी आजारी असते. त्यामुळे मी तिच्यासोबत राहिले तर तिला मदत होईल व माझेही शिक्षण सुरू राहील, असे ती म्हणाली.

माझ्या सावत्र आईला हे पटले. तिने आम्हा दोघा भावंडांना आत्याबरोबर पाठवले. माझ्या इतर भावंडांसह ती तिच्या माहेरी गेली. मी आत्याच्या घरी आले. तिला 2 मुले व 1 मुलगी होती. मुलीचे लग्न झाले होते. काही दिवस चांगले गेले. माझा भाऊ बाहेरून सामान आणून काकांचे काम पाहायचा. मी घर बघायचे. मावशीची काळजी घ्यायचे.

मला शिक्षणाची आवड होती. मावशीने मला शाळेत टाकले. आत्या म्हणायची, शाळा आपल्या ओळखीच्या माणसाची आहे. त्यामुळे दररोज जाण्याची गरज नाही. मग तिने मला कामाच्या बहाण्याने घरी थांबवले. मी महिन्यातून केवळ 2-4 दिवस शाळेत जायचे.

आत्याने मेहुणा झोपलेल्या खोलीत पाठवले
आता ही मुलगी केवळ घरकाम करून आत्याच्या घरातील सदस्याची काळजी घेत होती. ती सांगते की, काही दिवसांनी ती तिच्या भावंडांना व आईला भेटण्यास आली होती. 4-5 दिवसांनी आत्याने मेहुण्याला तिला घेण्यास पाठवले. आत्याने काकूने आईला सांगितले की, मोठ्या मुलाचा टिळ्याचा कार्यक्रम आहे. मी आले तर कामात मदत होईल. आईने मला मेहुण्यासोबत परत पाठवले.

मेहुण्याने वाटेत अनेकदा मला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला. माझ्याशी अश्लील बोलला. पण मला वेडीला काही कळलेच नाही. आम्ही घरी पोहोचलो. दुसर्‍या दिवशी भावाचा टिळ्याचा कार्यक्रम होता. मी आनंदात होते. पण तोच माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी दिवस ठरणार हे मला कुठे माहिती होते? रात्री सर्वांना झोपण्यासाठी खोल्यांमध्ये गाद्या टाकण्यात आल्या होत्या. सर्वजण आपापल्या जागेवर झोपल्यानंतर भाऊजी बाहेर आले. त्यांनी मला त्याचे डोके दुखत असल्याचे सांगितले.

आत्यांनी मला मेहुणा झोपणार असल्याची खोली दाखवली. तसेच तिकडे जाऊन त्यांचे डोके दाबण्याची सूचना केली. मी खोलीत गेले. तिथे अगोदरच 2 वृद्ध महिला झोपल्या होत्या. मी मेहुण्याचे डोके दाबले. मग तहान लागल्यामुळे मी पाणी प्यायला बाहेर जाऊ लागले. तेव्हा मेहुणा म्हणाला, पाणी येथे ठेवले आहे. ते पी. असे म्हणत त्याने मला एक बाटली दिली. ते पिऊन मी झोपी गेले.

सकाळी उठले तेव्हा माझे कपडे बाजूला पडलेले होते

सकाळ झाली... मला जाग आली, तेव्हा डोकं जड वाटत होतं. अंगात जडपणा आला होता. माझ्या अंगावर कपडे नव्हते. माझा सलवार-सूट जवळच पडला होता. माझ्या अंगावर केवळ एक चादर होती. खोलीत झोपलेल्या त्या 2 वृद्ध आजीही तिथे नव्हत्या. मला माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्रचंड वेदना होत होत्या.

मी लगेच उठले. चटकन कपडे घातले. काय झाले हे खूप वेळ मला समजलेच नाही. रात्री काय घडले हे ही फारसे आठवत नव्हते. मेहुण्याने माझ्याशी गैरवर्तन केल्याचा मला संशय आला. रात्री त्यांनी दिलेले पाणी प्यायल्यावर मी बेशुद्ध झाल्याचे माझ्या लक्षात आले.

आत्या म्हणाल्या, मेहुणा-मेहुणीत हे सर्व चालते
पीडित तरुणी म्हणाली, मी लगेच उठून आत्याकडे गेले. तेव्हा घरी टिळ्यासाठी पाहुणे मंडळी येणे सुरू झाले होते. आत्याच्या आजूबाजूला बरेच लोक होते. त्याही कामात होत्या. त्यादिवशी मला काहीही सांगता आले नाही. टिळा होईपर्यंत मी काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी मी आत्याला एकट्यात गाठले. मला वाटले की, ती माझ्या आईसारखी आहे. त्यामुळे तिला माझे म्हणणे समजेल. पण घडले उलटेच.

मी माझ्या आत्याला सगळा प्रकार सांगितला, तेव्हा ती फक्त हसली आणि म्हणाली, “तुला थट्टाही समजत नाही. तो तुझा मेहुणा आहे. मेहुणा-मेहुणीच्या नात्यात हे सर्वकाही चालते. काही वेळ आत्या काय म्हणाली हे मला समजलेच नाही. मी काही बोलणार तेवढ्यात आत्या म्हणाली - झाले गेले विसरून जा. बाहेर कुणाला काही सांगू नको. नाहीतर लोक तुझ्यावर संशय घेतील. मीही भीतीपोटी कुणाला काही सांगितले नाही.

भावाला सांगितल्यानंतर त्यानेही छेड काढली

भावाला सांगितल्यानंतर त्याने तर साथ दिली असेल? असा प्रश्न केला असता पीडिता मी काहीतरी चुकीचे विचारल्यासारखे ओरडली. अचानक तिच्या डोळ्यांत पाणी आले. ती म्हणते, दीदी त्या सर्वांचे संगनमत होते.

मी माझ्या भावाला ही गोष्ट सांगितली तेव्हापासून तो मला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करू लागला. तो बाहेर काम करायचा. पण घरी आल्यावर कुठल्या ना कुठल्या बहाण्याने तो मला इकडे-तिकडे हात लावायचा. ती म्हणाली- "दीदी, मी 7 वर्षे हे सर्व सहन केले."

7 वर्षात तीनदा गरोदर, आत्याने गर्भपात केला

पीडितेने आम्हाला (निळ्या रंगाच्या सूटमधील रिपोर्टरला) सांगितले की, तिचे पोट दुखायचे तेव्हा तिची आत्या तिला औषध द्यायची. हे गर्भपाताचे औषध असल्याचे मुलीला नंतर समजले.
पीडितेने आम्हाला (निळ्या रंगाच्या सूटमधील रिपोर्टरला) सांगितले की, तिचे पोट दुखायचे तेव्हा तिची आत्या तिला औषध द्यायची. हे गर्भपाताचे औषध असल्याचे मुलीला नंतर समजले.

या 7 वर्षांत मेहुण्याने तिच्यावर 4 वेळा बलात्कार केला. दीर्घ श्वास घेत ती म्हणते की, भाऊ व मेहुण्याने माझा असंख्य वेळा विनयभंग केला. एकेदिवशी माझ्या पोटात खूप दुखत होते. एक विचित्र वेदना होत होती, जी सहन होत नव्हती. हलकासा तापही होता. मी आत्याला सांगितल्यानंतर ती मला डॉक्टरांकडे घेऊन गेली.

त्यानंतर मला तिने एक औषध दिले. औषध घेतल्यानंतर वेदना कमी झाल्या. प्रत्येक वेळी मेहुणा माझ्यावर बलात्कार करायचा. तेव्हा असेच पोट दुखायचे. पण आत्याने औषध दिल्यानंतर ते थांबायचे. एकदा आत्या आपल्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. अचानक मला असह्य वेदना सुरू झाल्या. मी जवळच्याच एका मुलीसोबत डॉक्टरांकडे गेले. तेव्हा मला मी गरोदर असल्याचे समजले. डॉक्टरांनीच यापूर्वीही असे घडल्याचे मला सांगितले.

मला वाटले कुठे जाणार? म्हणून मेहुण्याशी लग्न केले
त्यावेळी मी एवढे लहान होते की, या सगळ्यांचा काय परिणाम होईल हे मला ठावूक नव्हते. हळुहळु मला सर्वकाही समजले. मग एके दिवशी बहीण व तिचा नवरा आत्याच्या घरी आले. माझी माफी मागितली, खूप प्रेमाने बोलली आणि आपल्या घरी येण्यास सांगितले. मी त्यांच्यासोबत गेले.

दुसर्‍या दिवशी सकाळी भाऊजींनी मला मंदिरात नेले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी माझ्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. थोडा वेळ मला काहीच समजले नाही. मग वाटले की, मेहुण्याने माझ्यासोबत जे काही केले त्याचा बोभाटा झाला तर कुणीही माझ्याशी लग्न करणार नाही. आत्याने घरातून हाकलून दिले तर कुठे जाणार. या सगळ्याचा विचार करून मी माझ्या मेहुण्याशी मंदिरात लग्न केले.

लग्नानंतर आम्ही पुन्हा दीदींच्या घरी पोहोचलो. मला वाटले, आता सर्वकाही ठीक होईल. पण लग्नानंतर मेहुण्याने पुन्हा माझ्यावर बळजबरी केली. दुसऱ्या दिवशी ते मला आत्याच्या घरी घेऊन गेले. ते मला म्हणाले की, तुला येथेच रहावे लागेल. मी त्याचा विरोध केला. माझे तुमच्याशी लग्न झाल्यामुले मी तुमच्यासोबत राहील असे मी म्हणाले. त्यावर त्यांनी मला मारहाण करून एका खोलीत डांबले. त्यानंतर ते निघून गेले.

फोनवरून घरी बोलले तर काका मारायचे
आता कुणाकडे मदत मागावी हेच कळत नव्हते. वडील तुरुंगात होते. आई वारली होती. या गोष्टी समजण्यास भाऊ-बहीण खूप लहान होते. शेवटी मी ठरवले की, मी माझ्या सावत्र आईला सर्वकाही सांगेन. पण त्यावेळी माझ्याकडे मोबाईल नव्हता. कधी-कधी आत्याच्या नंबरवर तिचा फोन यायचा. तेव्हा आम्ही बोलायचो. आत्या ला नेहमी समोर बसवून स्पीकरवर बोलण्यास सांगत.

संधी साधून मी आत्याचा फोन घेतला व आईला फोन केला. त्यांना सगळा प्रकार सांगितला. मला मदत कर, असे सांगितले. मी आईशी बोलतांना काकांनी पाहिले. त्यांनी फोन हिसकावून कॉल कट केला. मला बेदम मारहाण केली. रडताना माझी दातखिळी बसायची. पण त्यांची मारहाण थांबत नव्हती.

काकांनी आत्यासह सर्वांना सांगितले की, मी माझ्या आईला सर्वकाही सांगितले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेहुणा व मोठा भाऊ घरी आले. आत्या व हे दोघे माझ्या सावत्र आईच्या घरी गेले. त्यांनी तिलाही धमकावले. तिच्याशी वाद घालत म्हणाले - “तुझा नवरा तुरुंगात आहे. बलात्काराचे प्रकरण बाहेर आले, तर तुमचा नवरा अशा जाळ्यात अडकेल की, तो कधीच बाहेर पडू शकणार नाही. आईची माझी मदत करण्याची इच्छा होती. पण हे ऐकूण ती गप्पगार झाली.

वडील तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांना सांगितले, त्यानंतर गुन्हा दाखल केला
वर्ष 2021. मुलीचे वडील तुरुंगातून सुटले. त्यांनी मला घरी बोलावले. काही दिवस मी त्यांच्यासोबत राहिले. पण त्यांना काहीही सांगण्याची माझी हिंमत झाली नाही. मी आईलाही ही गोष्ट सांगण्यास नकार दिला. वडील मला समजून घेणार नाहीत, अशी भीती वाटत होती.

काही दिवस असेच गेले. आत्याच्या घरून सातत्याने मला धमक्या मिळत होत्या. कुणाला काही सांगितले तर वडिलांना पुन्हा तुरुंगात पाठवू, असे ते म्हणायचे. याला कंटाळून मी एकेदिवशी वडिलांना सर्वकाही सांगितले. वडिलांनीही माझी साथ दिली. त्यांनी मला पोलिस ठाण्यात नेऊन एफआयआर नोंदवला.

आजही ते लोक घरी येऊन धमक्या देतात

वकिलाच्या सांगण्यावरून पीडितेने तिच्यावर बेतलेल्या सर्व प्रसंगांची डायरीत नोंद केली आहे.
वकिलाच्या सांगण्यावरून पीडितेने तिच्यावर बेतलेल्या सर्व प्रसंगांची डायरीत नोंद केली आहे.

पीडित तरुणी सांगते, एफआयआर नोंदवल्यानंतर आत्या, मेहुणा व भाऊ घरी आले. त्यांनी आमच्याशी भांडण केले. केस मागे न घेतल्यास सर्वांना ठार मारेन, अशी धमकी त्यांनी माझ्या वडिलांना दिली. मुलगी घाबरलेल्या आवाजात म्हणते, “दीदी, त्या लोकांची वरपर्यंत ओळख आहे. ते आम्हाला नेत्यांच्या नावाने धमक्या देतात. आम्ही गरीब लोक आहोत. आम्हाला फक्त न्याय हवा आहे."

पीडितेचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. ती कोर्टात गेल्यानंतर आरोपी तिचा पाठलाग करतात. भीती घालण्याचा प्रयत्न करतात. खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देतात. पण एक दिवस न्याय मिळेल, असा तिला ठाम विश्वास आहे.

टीप: पीडिता व तिच्या कुटुंबाची ओळख खबरदारीस्तव लपवण्यात आली आहे.