आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवारी रात्री लखनऊमधील झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकाने जेवण घेण्यास नकार दिला. कारण काय, तर डिलिव्हरी बॉय दलित होता. डिलिव्हरी बॉय दलित असल्याचे ग्राहकाला समजताच त्याने जेवण घेण्यास नकार दिल्याचा आरोप आहे.
एवढेच नाही तर कुटुंबीयांसह मिळून डिलिव्हरी बॉयलाही बेदम मारहाणही केली. एवढ्यावरच या ग्राहकाचे समाधान झाले नाही तेव्हा तो त्याच्या चेहऱ्यावर थुंकलासुद्धा. ही संपूर्ण घटना आशियाना भागातील आहे. डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीवरून पोलिसांनी 2 ज्ञात, 12 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हे प्रकरण केवळ मारहाणीचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
नाव ऐकताच ग्राहक संतापला
आशियाना येथे राहणारा विनीत रावत झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय आहे. शनिवारी रात्री त्याला आशियानामध्येच अजय सिंह नावाच्या ग्राहकाला डिलिव्हरी देण्यासाठी पाठवले होते. तो डिलिव्हरी घेऊन गेला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत विनीतने आरोप केला आहे की, त्याने अजय सिंगला त्याचे नाव विनीत रावत असल्याचे सांगितले. यावर तो संतापला. तो शिवीगाळ करत म्हणाला– आता आम्ही तुझ्यासारख्यांनी शिवलेले सामान घ्यावे का? त्यावर तो त्याला म्हणाला, तुम्हाला जेवण घ्यायचे नसेल तर कॅन्सल करा, पण शिवीगाळ करू नका."
यावर त्याने आधी फूड पॅकेट फेकले, नंतर तोंडावर तंबाखू थुंकली. विनीतने विरोध केला असता अजय आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याला काठ्यांनी मारहाण केली. विनीतने कशीबशी सुटका करून पोलिसांना माहिती दिली. थोड्या वेळाने डायल-112 ची टीम आली, विनीतला त्याची गाडी मिळाली आणि त्याला पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यास सांगितले.
याप्रकरणी आशियानाचे इन्स्पेक्टर दीपक पांडे सांगतात की, शनिवारी रात्री जेव्हा विपिन ऑर्डर घेऊन आला तेव्हा अजयला मित्राला सोडण्यास जात होते. अजयच्या म्हणण्यानुसार, घराबाहेर निघत असतानाच विनीत पोहोचला. विनीतने त्यांना त्यांच्या पत्ता विचारला. अजयने पान मसाला खाल्ला होता. विनीतला पत्ता सांगण्यासाठी त्याने मसाला थुंकला. त्याचे शिंतोडे विनीतवर उडाले. यावर विनीतने शिवीगाळ करत वाद घातला. यावरून अजय आणि त्याच्या कुटुंबीयांनी विनीतला मारहाण केली.
वकिलासह पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर FIR दाखल
पोलिसांनी सांगितले की, विनीतच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही पक्षांना शांत केले. पोलीस विनीतला पोलीस ठाण्यात घेऊन येत होते. मात्र त्याने त्यावेळी नकार दिला. रविवारी वकिलासोबत येऊन एफआयआर दाखल केला. सध्या तक्रार नोंदवून तपास सुरू आहे. दोन्ही बाजूंची कसून चौकशी केली जाईल. जवळपास बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.