आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lufthansa Air Cancels 800 Flights I Passenger Said Make Arrangements To Go Or Return The Money I

वैमानिकांचा संप, दिल्ली विमानतळावर गोंधळ:लुफ्थांसा एअरचे 800 विमाने रद्द; प्रवाशी म्हणाले- जाण्याची व्यवस्था करा, अन्यथा भाडे परत द्या

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीच्या लुफ्थांसा एअरलाइन्सच्या वैमानिकांनी पगारवाढीच्या मागणीसाठी शुक्रवारी एक दिवसीय संपावर आहेत. यामुळे विमान कंपन्यांची संपूर्ण यंत्रणा हादरली आहे. आज जगभरात लुफ्थान्साची 800 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

त्यामुळे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 700 हून अधिक प्रवासी अडकून पडले आहेत. उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला, आमचे प्रवासाची रक्कम परत करा नाहीतर जाण्याची व्यवस्था करा, अशी संतप्त भूमीका प्रवाशांनी घेतल्याने विमातळावर चांगलाच गोंधळ उडाला होता.
दिल्लीहून उड्डाण करणारी दोन विमानांची सेवा कोलमंडली
विमान रद्द केल्याने संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला आहे. त्यामुळे विमानतळाच्या आत सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले. लुफ्थांसा एअरलाइन्सची दोन विमानांचे उड्डाण दिल्ली विमातळावरून मुन्यिक आणि फ्रँकफर्टला सुमारे 400 प्रवाशांना घेऊन जात होती. प्रवाशांचे म्हणणे आहे की जेव्हा ते विमानतळावर पोहोचले. तेव्हा त्यांना कळले की, उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

200 प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठविले गेले
Lufthansa Airlines ने प्रवास करणारे काही प्रवासी हे विद्यार्थी आहेत. ज्यांना परीक्षेसाठी परदेशात जावे लागले. उड्डाणे रद्द झाल्याने आमचे भविष्य धोक्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विमानतळावर घोषणाबाजी केली जाऊ लागली. गोंधळ वाढत असताना, विमान कंपनीने सुमारे 200 प्रवाशांना त्यांच्या जाण्याच्या ठिकाणी दुसऱ्या विमान कंपनीद्वारे पाठविले आहे. दिल्ली विमानतळावर सद्या 500 प्रवाशी अडकून पडले आहेत.

पगार, महागाई भत्त्यात वाढ करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
पायलट युनियनने यावर्षी 5,000 हून अधिक वैमानिकांच्या पगारात 5.5% वाढ आणि महागाई भत्त्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने वैमानिक एक दिवसीय संपावर गेले. दरम्यान, लुफ्थांसाला या वर्षी वेतन वाढवण्यासाठी सुरक्षा कर्मचारी आणि ग्राउंड कर्मचार्‍यांकडून करण्यात आलेल्या अनेक संपाना सामोरे जावे लागले. जुलैत जर्मनीच्या शक्तिशाली व्हर्डी एअरलाइन युनियनने बोलावलेल्या एक दिवसीय संपाचा सामना लुफ्थांसाला सामना करावा लागला. ज्यामुळे फ्रँकफर्ट आणि म्युनिकमधील देशांतर्गत हबच्या लुफ्थांच्या फ्लाइटवर परिणाम झालेला पाहायला मिळाला.

बातम्या आणखी आहेत...