आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lured By A Kite, The Boy Drowned In The River; Rohit Mali Missing For Three Days

तपास सुरू:पतंगाच्या मोहापायी मुलगा नदीत बुडाला ; रोहित माळी तीन दिवसांपासून बेपत्ता

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुखेड (ता. येवला) येथील १३ वर्षीय रोहित पिंटू माळी याचा गोई नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतदेह तीन दिवसानंतर नदीपात्रात तरंगताना आढळला. पतंग व काठी नदीजवळ सापडल्याने पतंगाच्या मोहापायी त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मुखेड येथील रोहित माळी तीन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना शनिवारी रोहितचा मृतदेह येथीलच गोई नदीपात्रात आढळला. शेजारीच पतंग व काठीवरून रोहितचा मृत्यू पतंगाच्या मोहासाठी झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...